मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:47 AM2017-08-22T00:47:37+5:302017-08-22T00:47:42+5:30

शनिवारसह रविवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाने, सोमवारी मात्र काहीसा आखडता हात घेतला. मुसळधार नाही मात्र, किमान काही अंतराच्या फरकाने मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप दिवसभर सुरूच असल्याचे चित्र होते.

Rainfall in Mumbai will start in 48 hours, heavy rains, weather forecast | मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

Next

मुंबई : शनिवारसह रविवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाने, सोमवारी मात्र काहीसा आखडता हात घेतला. मुसळधार नाही मात्र, किमान काही अंतराच्या फरकाने मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप दिवसभर सुरूच असल्याचे चित्र होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत रिपरिप पडलेला हा पाऊस मुंबईकरांसाठी काहीसा त्रासदायक ठरला असला, तरी पावसामुळे येथील वातावरणात आलेल्या गारव्याने मुंबापुरी चांगलीच थंडावली होती.
सोमवारी सकाळी किंचितसा जोर पकडलेल्या पावसाने, दुपारसह सायंकाळी मात्र काहीसा वेग कमी केला. अधूनमधून होणारी रिपरिप मुंबईचे रस्ते ओले करत असतानाच, येथील गारव्यात भर घालत होती. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडत होती. सोमवारी शहरात ६.५३ मिलीमीटर, पूर्व उपनगरात १.१४ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ०.२८ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. पूर्व उपनगरात दोन, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी घराचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. शहरात एक, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण चार ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
पश्चिम उपनगरात एका ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली.
यात कोणतीही जीवितहानी
झाली नाही. दरम्यान, येत्या ४८ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

Web Title: Rainfall in Mumbai will start in 48 hours, heavy rains, weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.