राज ठाकरेंचं 'ते' विधान बालिशपणाचं; रामदास आठवलेंचा 'शाब्दिक स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 03:19 PM2019-03-05T15:19:23+5:302019-03-05T15:20:40+5:30

जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवून आणला आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे.

Raj Thackeray's statement on pulwama attack is like child, ramdas athavale slam raj thackarey | राज ठाकरेंचं 'ते' विधान बालिशपणाचं; रामदास आठवलेंचा 'शाब्दिक स्ट्राईक'

राज ठाकरेंचं 'ते' विधान बालिशपणाचं; रामदास आठवलेंचा 'शाब्दिक स्ट्राईक'

Next

मुंबई - राज ठाकरेंसारखा राष्ट्रवादी नेता, उत्तर भारतीयांबद्दल त्यांचे काही मतभेद असतील, पण राष्ट्रवादी भूमिका ठेवणाऱ्या राज ठाकरेंसारख्या नेत्याचे ते विधान बालिश पणाचे आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. मात्र, यावरुन राजकारण करता कामा नये. राज ठाकरेंनी या हल्ल्यामागे मोदींना जबाबदार धरलं असून मोदींनेच हा हल्ला घडवून आणल्याचा राज यांचा आरोप बालिशपणाचा आहे, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे. 

जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवून आणला आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. मात्र, मोदींनीच हा हल्ला घडवल्याचं सांगणं हे अतिशय बालिशपणाचं लक्षण आहे. आता, एअर स्ट्राईक करुन बदला घेतला, पण विरोधक म्हणातायेत की निवडणुकांच्या उद्देशाने हा स्ट्राईक केला आहे. जर बदला घेतला नसता, तर म्हटले असते या सरकारने काहीच केले नाही. मला वाटतं एअर स्ट्राईकवरुन राजकारण करू नये, असे म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना चपराक लगावली. दरम्यान, राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्यातील शहीद हे राजकीय बळी असल्याचं वक्तव्य केलं होते. कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलतान राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच अजित डोवाल यांच्याही चौकशीची मागणी केली होती. आज, उल्हासनगर येथील पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पाकिस्तानने मसूद अजहर आणि दाऊद इब्राहिमला भारताच्या हवाली करायला हवी. यांसारख्या दहशतवाद्यांना स्वत:च्या देशात ठेवणे चुकीचं आहे. पाकिस्तानने भारतासोबत दोस्ती करावी, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताला मदत करावी. भाजपाच्या सबका साथ, सबका विकास या घोषवाक्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानचा विकास म्हणजे सबका विकास असे मानून औद्यागिक आणि व्यापारी प्रगतीसाठी इम्रान खान यांनी प्रयत्नशील राहावे, असेही आठवले यांनी म्हटले.  

निवडणुकांचा फायदा घेण्यासाठी हा एअर स्ट्राईक केला नसून पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी हा स्ट्राईक केला होता. पण, अप्रत्यक्षपणे याचा आम्हाला फायदा होणारचं, आता फायदा होणार तर आम्ही काय करणार, राजकारणात तोटा होण्यासाठी थोडंच आहोत, असेही आठवले म्हणाले. सध्या देशात वातावरण बदलले असल्याने एनडीएला 300 च्या जवळ जागा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, शेवटी जनता जनार्दन असून त्यांचा कौल आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: Raj Thackeray's statement on pulwama attack is like child, ramdas athavale slam raj thackarey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.