'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 02:07 PM2019-01-27T14:07:42+5:302019-01-27T14:18:41+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राजकीय दबदबा आणि राजकीय व्यक्तींशी असलेला स्नेह नेहमीच विविध कार्यक्रमातून जाणवतो.

Raj's son's wedding receives huge politicians, Pawar's attendance with CM | 'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी

'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी

Next

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आज (27 जानेवारी) विवाहबद्ध होत आहेत. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीयमंत्री नितिन गडकरींपर्यंत मोठे मंत्री या सोहळ्याला हजर होते. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राजकीय दबदबा आणि राजकीय व्यक्तींशी असलेला स्नेह नेहमीच विविध कार्यक्रमातून जाणवतो. आता, चक्क त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातूनच याची प्रचिती आली आहे. राजपुत्र अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अमित आणि मिताली यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरली. 

* या दिग्गजांची लग्नमंडपात हजेरी

केंद्रीयमंत्री नितिन गडकरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस
खासदार शरद पवार हेही खासदार सुप्रिया सुळेंसह हजर होते.
उद्योगपती रतन टाटा
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
अभिनेते आमीर खान
अभिनेता रितेश देशमुख
आमदार अमित देशमुख
गायिका आशा भोसले
माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
आमदार आशिष शेलार
दिग्दर्शक साजिद खान

* ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती

उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. तर आदित्य ठाकरेंनीही हजेरी लावली होती. 
जयदेव ठाकरेही हजर होते. 
 

Web Title: Raj's son's wedding receives huge politicians, Pawar's attendance with CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.