राऊतांनी कारवाईची मागणी केली, पटोलेंनी विशाल पाटलांना इशारा दिला; म्हणाले, पक्षशिस्त मोडली तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:02 PM2024-04-18T19:02:45+5:302024-04-18T19:05:10+5:30

Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन तिढा सुरू आहे.

Sangli Lok Sabha Election 2024 Sanjay Raut demanded action Nana Patole warned Vishal Patil | राऊतांनी कारवाईची मागणी केली, पटोलेंनी विशाल पाटलांना इशारा दिला; म्हणाले, पक्षशिस्त मोडली तर...'

राऊतांनी कारवाईची मागणी केली, पटोलेंनी विशाल पाटलांना इशारा दिला; म्हणाले, पक्षशिस्त मोडली तर...'

Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन तिढा सुरू आहे. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे असून काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांना इशारा दिला आहे. 

'कारखाना चालवायला येत नाही, निघाले खासदार व्हायला'; अजितदादांनी विशाल पाटलांना डिवचलं

काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अजूनही सांगली लोकसभेवरुन दावा सोडलेला नाही. विशाल पाटील यांनी सोमवारी एक काँग्रेसमधून आणि दुसरा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे कोंडी होत असल्याचे दिसत आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसकडे कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, आज नाना पटोले यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. नाना पटोले म्हणाले, विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू. विशाल पाटील यांनी पक्षशिस्त मोडली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करु, असा इशाराही नाना पटोले यांनी विशाल पाटील यांना दिला. "विशाल पाटील यांना आम्ही समजावत आहोत, असंही पटोले म्हणाले.

अजितदादांनी विशाल पाटलांना डिवचलं

"मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले, वसंतदादांनीही साखर कारखाना चांगला काढला. त्या कारखान्याचं वाटोळ कुणी केलं, आज तुम्ही दुसऱ्याला चालवायला कारखाने देता. साखर कारखाना चालवायची तुमच्यामध्ये धमक नाही.आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो, बँकांचं काय केलं? आज काय परिस्थिती आहे, अशी टीका अजित पवार यांनी विशाल पाटील यांच्यावर केली.

"इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही  सगळे सांगलीच उदाहरण देत होतो, सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर तो वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला. पण, आता कोणतही दारु म्हणून तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघतो. ही तुमची परिस्थिती आहे, तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघालाय याचा कुठेतरी विचार करा, असा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लगावला.  

Web Title: Sangli Lok Sabha Election 2024 Sanjay Raut demanded action Nana Patole warned Vishal Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.