शेडाशीवर लाल बावटा
By admin | Published: November 24, 2014 10:56 PM2014-11-24T22:56:41+5:302014-11-24T22:56:41+5:30
तालुक्याच्या सीमेवर असलेल्या व खालापूर तालुक्याचे अंतिम टोक असलेल्या शेडाशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.
Next
पेण : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या व खालापूर तालुक्याचे अंतिम टोक असलेल्या शेडाशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये शेकापने चार जागा बिनविरोध निवडून ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी घेतली होती. निवडणूक झालेल्या तीन जागांवरही शेकापचे उमेदवार विजयी झाले असून विरोधक म्हणून शिवसेनेने उभे केलेल्या उमेदवारांचा दणदणीत पराभव करीत शेडाशी ग्रामपंचायतवर शेकापचा लाल बावटा फडकला आहे.
आजच्या निकालात शेकापचे सुभाष पवार यांना 191 मते तर शिवसेनेचे नीलेश जाधव यांना 114 मते मिळाल्याने 75 मतांनी सुभाष पवार विजयी झाले. शेकापच्या गीता पवार यांनी सेनेच्या पूनम जाधव यांचा 91 मतांनी पराभव केला. शेकापच्या हरेश पवार यांनी नागू दामा भला यांचा 6 मतांनी निसटता पराभव केला. बिनविरोध असलेले शेकापचे उमेदवार यशोदा वामन वाघ 2 जागी, मारूती दीपक सावंत व सचिन अशोक सावंत असे सात उमेदवार शेकापचे आहेत. ओबीसी प्रवर्गातील उमेदवार नसल्याने 9 पैकी 7 जागा शेकापने जिंकल्या.
रावे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नूतन अल्केश पाटील यांनी शेकापच्या वैजयंती सुभाष पाटील यांचा 127 मतांनी पराभव केला. रावे सरपंच पदाचे आरक्षण असलेल्या या जागेसाठी शेकाप विरू ध्द काँग्रेस अशी ही लढत झाली. (वार्ताहर)