शिवाजी राजांच्या पालखीला ढोल-ताशांचाही मुजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:17 AM2018-02-20T02:17:27+5:302018-02-20T02:18:05+5:30

दिल्लीसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना मुंबईतील शहर व उपनगरात विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या शोभायात्रांनी लक्ष वेधले.

Shivaji Raje's palanquin drum-cards also mujra! | शिवाजी राजांच्या पालखीला ढोल-ताशांचाही मुजरा!

शिवाजी राजांच्या पालखीला ढोल-ताशांचाही मुजरा!

Next

मुंबई : दिल्लीसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना मुंबईतील शहर व उपनगरात विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या शोभायात्रांनी लक्ष वेधले. त्यात ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक असलेल्या शिवरूद्रा प्रतिष्ठानच्या शोभायात्रेने गिरणगावकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. परळच्या नरे पार्कपासून अभ्युदयनगरमधील शहीद भगतसिंह मैदानापर्यंत निघालेल्या या शोभायात्रेत विविध आकर्षणांनी शिवप्रेमींच्या उत्साहात भर टाकली.
परळच्या रांगोळीने वेढलेल्या नरे पार्क मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन शिवरूद्रा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या पहिल्यावहिल्या शोभायात्रेस सायंकाळी सुरुवात झाली. या वेळी तरुणींनी काढलेल्या सुरेख रांगोळीभोवती ढोल-ताशांचा गडगडाट करून ‘परळ पुणेरी’ या ढोलपथकाने शोभायात्रेला जोरदार सलामी दिली. तर ऋतुराज शिरोडकर याच्या पथकाने चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करून शिवप्रेमींच्या काळजाचे ठोके चुकवले.
याशिवाय गोरेगावमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेत तरुण व तरुणींनी पारंपरिक पेहरावात सहभाग घेतला. तर भायखळ्यातील श्री कापरेश्वर कृपा गृहनिर्माण संस्थेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर आधारित नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या वेळी शिवप्रेमींसाठी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही मोफत भरवण्यात आले होते.
कांजूरमार्ग पूर्वेकडे समाजामध्ये एकमेकांविषयी सलोखा कायम राखण्याचा संदेश देत शिवप्रेमींनी शिवजयंती साजरी केली. चारकोप येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानने कांदिवली पश्चिमेकडील आकर्षण सोसायटीमध्ये ‘पर्यावरणस्नेही शिवजयंती’ साजरी केली. या वेळी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

शोभायात्रेतील वैशिष्ट्ये -
शोभायात्रेतील घोड्यावर स्वार बालशिवाजी आणि मावळ्यांनी उपस्थितांना सेल्फी घेण्यास भाग पाडले.
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत महिला व तरुणींनी महाराजांची पालखी खांद्यावर घेताच, सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
या आगळ्यावेगळ्या शोभायात्रेने लालबागच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे प्रवास करत काळाचौकी गाठली. स्थानिकांनी महाराजांचे दर्शन घेण्यास केलेल्या गर्दीतूनच वाट काढत रात्री दत्ताराम लाड मार्गे पालखी सोहळा शहीद भगतसिंह मैदानात मोठ्या थाटामाटात पोहोचला. या ठिकाणी लष्करी अधिकाºयांच्या हस्ते या दिमाखदार शोभायात्रेचा समारोप झाला.

Web Title: Shivaji Raje's palanquin drum-cards also mujra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.