सूर्या नदीवरील पुल पाण्याखाली
By Admin | Published: September 11, 2014 12:26 AM2014-09-11T00:26:34+5:302014-09-11T00:26:34+5:30
पावसाळ्यात नेहमीप्रमाणे मनोर-पालघर रस्त्यावरील मासवण येथील सूर्या नदीवरील पूल पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेल्याने दिवसभरात ११ तास मनोर-पालघर रस्त्यावरील वहातूक ठप्प झाली होती
मनोर : पावसाळ्यात नेहमीप्रमाणे मनोर-पालघर रस्त्यावरील मासवण येथील सूर्या नदीवरील पूल पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेल्याने दिवसभरात ११ तास मनोर-पालघर रस्त्यावरील वहातूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवासी व वहातूकदारांसह विद्याथ्यांचे हाल झाले.
हा पूल कमी उंचीचा असल्याने पूल नेहमी पाण्याखाली जातो.दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होते. बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून सूर्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे व पाऊस मूसळधार पडत असल्याने संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत पुलावर पाणी होते. काही प्रवासी एसटी व खासगी वाहनांमध्ये अडकून पडले होते. दरवर्षी पावसाळ््यात हा पूल पाण्याखाली जातो. पालघर-मनोरवासियांसाठी संपर्क तुटल्याने सबंधीत विभागावर संताप वक्त केला .