हार्बर विस्तारीकरणाचा श्रेयवाद चिघळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:11 AM2018-04-02T07:11:05+5:302018-04-02T07:11:05+5:30

गोरेगाव हार्बर विस्तारीकरणामुळे सुरू झालेला शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी काम न करता, दुसऱ्यांचे श्रेय लाटण्याची भाजपाची जुनी परंपरा असल्याची टीका केली आहे.

 Thanks to the harbor extensiveness! | हार्बर विस्तारीकरणाचा श्रेयवाद चिघळला!

हार्बर विस्तारीकरणाचा श्रेयवाद चिघळला!

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई  - गोरेगाव हार्बर विस्तारीकरणामुळे सुरू झालेला शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी काम न करता, दुसऱ्यांचे श्रेय लाटण्याची भाजपाची जुनी परंपरा असल्याची टीका केली आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर कीर्तिकर यांनी प्रथमच आरे येथील पहाडी रोड शाळा मार्गावरील स्नेहदीप कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. या वेळी त्यांनी गोरेगाव विस्तारीकरणाबाबत कामाचे श्रेय लाटण्यासाठी बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर व त्यांचे चिरंजीव दीपक ठाकूर यांनी केलेल्या जोरदार बॅनरबाजी आणि घोषणाबाजीचा समाचार घेतला. पश्चिम उपनगरात शिवसेना भाजपाला पुरून उरेल, हे सांगतानाच, हार्बर रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी साडेतीन वर्षे केलेल्या प्रयत्नांची कागदपत्रे त्यांनी सादर केली.
कीर्तीकर पुढे म्हणाले, जोगेश्वरी व गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान उभारलेल्या राम मंदिर नामकरण्यासाठी महानगर पालिकेसह मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव मंजूर करून घेतला. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडेही सतत पाठपुरावा केला.
२८ मार्चला शिवसेनेने हार्बर विस्तारीकरण कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने हे प्रकरण तापणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. उद्घाटन कार्यक्रमाची वेळ ७ची असली, तरी मुख्यमंत्री तेव्हा दिल्लीत होते, तर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयाल यांचे विमान रात्री ८.३० वाजता येणार होते. रेल्वेमंत्री कार्यक्रमस्थळी प्रत्यक्षात साडेनऊ वाजता पोहोचले. शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते सात वाजताच हजर होते. खासदार कीर्तिकर यांना रेल्वेच्या अधिकाºयांनी एक दिवस आधी कार्यक्रमाची माहिती दिली होती. विद्या ठाकूर यांनी या कामाचे श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री यांच्या वेळा घेऊन, कार्यक्रम ठरविल्याचा आरोपही कीर्तिकर यांनी केला.

शिवसेनेने केले विस्तारीकरणासाठी प्रयत्न - कीर्तिकर

च्१५ जानेवारी २०१५ रोजी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन, २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पात प्रकल्पाच्या समावेशाची मागणी.
च्२१ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या मुंबईचे खासदार व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या बैठकीत या कामातील अडथळ्यांवर चर्चा आणि कामाचा आढावा.
च्७ आॅक्टोबर २०१६ रोजी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याबरोबर बैठक घेत, बहुतांश काम पूर्ण होऊन हार्बर रेल्वेला उशीर का, याचा जाब शिवसेनेने विचारला.
च्अंधेरी-गोरेगाव हार्बर रेल्वे विस्तारीकरणात झोपड्यांचे अडथळे होते, ते कोर्टात जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठका घेतल्या.
च्शिवसेनेच्या प्रयत्नाने या प्रकल्पग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन करून, हा रेल्वेमार्ग खुला करण्यात आला.

भाजपाची
लोकप्रियता घटतेय
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेकडे तळागाळात काम करणाºया कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. मतदारांशी त्यांचा थेट संबंध आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत शिवसेना मोठी बाजी मारेल, असा विश्वास खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला. २०१४ मध्ये असलेली भाजपाची लोकप्रियता आता कमी होत असून, २०१९ साली त्यांचा पराभव निश्चित आहे, असे कीर्तिकर म्हणाले.

चर्चा अन् परस्परविरोधी विधाने
एकीकडे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे युतीच्या चर्चेची जबाबदारी टाकली जाते, तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये युतीबाबत परस्परविरोधी विधाने करतात. त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे गाफील न राहता, उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने एकला चलोची तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण उत्तर पश्चिम लोकसभा मतदार
संघातून लढवणार असून, युती झाली नाही, तरी निवडणूक जिंकू, असा विश्वास खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

Web Title:  Thanks to the harbor extensiveness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई