उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक संपन्न

By मनोहर कुंभेजकर | Published: April 23, 2024 11:36 AM2024-04-23T11:36:31+5:302024-04-23T11:36:57+5:30

Mumbai: उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार व नियोजन संदर्भात इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या महिला पुरुष वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक यशस्वीरीत्या पार पडली.

The meeting of the constituent parties of India Aghadi concluded in North West Lok Sabha Constituency | उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक संपन्न

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक संपन्न

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार व नियोजन संदर्भात इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या महिला पुरुष वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या मतदार संघातून उद्धव सेनेचे उमेदवार व उपनेते
अमोल कीर्तिकर उभे आहेत.

यावेळी सर्व प्रमुख नेत्यांनी संविधान व लोकशाही रक्षणासाठी इंडिया आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, आप, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष व अन्य पक्ष एकजुटीने लढत असल्याची ग्वाही दिली. उत्तर पश्चिम मतदारसंघासह मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व नेते व कार्यकर्ते यापुढे एकदिलाने काम करतील असे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले.

सदर बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांना शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते,माजी मंत्री विभागप्रमुख अँड. अनिल परब, काँग्रेस नेते व माजी मंत्री आमदार अस्लम शेख,  विभागप्रमुख, आमदार सुनिल प्रभू, लोकसभा समन्वयक, आमदार विलास पोतनीस, शिवसेना उपनेत्या,खासदार प्रियंका चतुर्वेदी, उपनेत्या शितल शेठ देवरुखकर, काँग्रेस माजी आमदार सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव, बलदेव खोसा,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, अल्पना पेंटर, सी पी एम चे प्रदीप साळवी,आपचे रुबेन मस्कर्हेन्स, शिवसेना उपनेत्या व महिला विभाग संघटक राजुल पटेल, प्रियांका चतुर्वेदी, शितल शेठ देवरुखकर, महिला विभाग संघटक साधना माने आणि अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.  

Web Title: The meeting of the constituent parties of India Aghadi concluded in North West Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.