मंत्रालयात विनापेट्रोलवाली इलेक्ट्रीक कार, 90 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 120 किमी धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:17 PM2018-09-25T17:17:13+5:302018-09-25T17:24:23+5:30
ध्वनी प्रदूण, वायू प्रदुषणाला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारकडून प्रथमच इलेक्टीक कारची खरेदी करण्यात आली आहे. सरकारने खरेदी केलेल्या या कार चार्जिंगवर चालणार आहेत.
मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात नवीन इलेक्टीकल कारची एन्ट्री झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारची सफर करुन या गाडींच्या शुभारंभ केला. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचे दर लक्षात घेता, सरकारी अधिकाऱ्यांना फिरविण्यासाठी ही गाडी उत्तम ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेत 5 इलेक्टीक कार दाखल झाल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि राम शिंदे या मंत्र्यांनी या गडीची सैर केली.
ध्वनी प्रदूण, वायू प्रदुषणाला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारकडून प्रथमच इलेक्टीक कारची खरेदी करण्यात आली आहे. सरकारने खरेदी केलेल्या या कार चार्जिंगरवर चालणार आहेत. विशेष म्हणजे 90 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही कार 120 किमीचे अंतर पार करते. इलेक्टीकच्या डीसी आणि एसी करंटवर या गाड्या चालू शकतात. सरकारकडून पुढील सहा महिने या गाड्यांची कार्यक्षमता तपासून पाहण्यात येईल. त्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी 14 गाड्या आपल्या ताफ्यात सामावून घेणार आहे.
दरम्यान, आगामी वर्षभरात 1 हजार गाड्या शासन दरबारी सामावून घेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारच्या एनर्जी इफिशियन्सी सर्व्हीस लिमिटेड या संस्थेमार्फत इलेक्ट्रीक कारचा कार्यक्रम राबविला जात आहे. इलेक्ट्रीक कार ही सीएनजीवर चालणाऱ्या कारपेक्षा पूर्णत: वेगळी आहे. या कारमध्ये बसल्यानंतर तुम्हाला इंजिनचा अजिबात आवाज जाणवणार नाही. विशेष म्हणजे सरकारकडून या कार खरेदीसाठी 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
.@EESL_India handed over electric vehicles to PWD Department in presence of CM @Dev_Fadnavis at Mantralaya, Mumbai.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 25, 2018
Minister Chandrakant Patil, Chandrashekhar Bawankule, Ram Shinde, Mahadev Jankar, Sadabhau Khot, Babanrao Lonikar were present. pic.twitter.com/ect1mlrLHL