मत्स्य संपदा योजनेसारखे कार्यक्रम हाती घेणार; पीयूष गोयल यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 08:39 AM2024-05-13T08:39:33+5:302024-05-13T08:39:44+5:30
वेनिला तलाव येथे प्रचार फेरीची सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विचार करून केंद्र सरकार मत्स्य संपदा योजनेसह अनेक योजना राबवीत आहे. येत्या काळात अशा अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिली.
गोयल यांच्या नमो यात्रेला मालाड येथील जरीमरी मंदिर येथून रविवारी प्रारंभ झाला. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात जन आशीर्वाद रथासह ही रॅली पटेलवाडी, शंकरवाडी, आयएनएस हमलामार्गे आक्सा गावात पोहोचली. यावेळी पीयूष गोयल यांचे रहिवाशांनी जोरदार स्वागत केले. यावेळी पीयूष गोयल यांना मच्छिमारांची पारंपरिक टोपी घालण्यात आली. भाटी कोळीवाडा येथे त्यांनी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. मढ येथील भाजी मार्केट येथे त्यांनी फेरीवाल्यांशीही संवाद साधला. त्यानंतर दर्यादीप सोसायटीतील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. वेनिला तलाव येथे प्रचार फेरीची सांगता झाली. फेरीत खासदार गोपाळ शेट्टी सहभागी झाले होते.