साथही देऊ अन् लाथही मारू - उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला केले लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 06:07 AM2017-10-01T06:07:00+5:302017-10-01T06:07:53+5:30

शिवसेनेचे सगळे काही खणखणीत अन् ठणठणीत असते. आम्ही सरकारला साथही देऊ आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी लाथा मारू, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना केंद्र व राज्य सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.

Together with Lata - Married to Uddhav Thackeray, Prime Minister Narendra Modi and the BJP | साथही देऊ अन् लाथही मारू - उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला केले लक्ष्य

साथही देऊ अन् लाथही मारू - उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला केले लक्ष्य

Next


मुंबई : शिवसेनेचे सगळे काही खणखणीत अन् ठणठणीत असते. आम्ही सरकारला साथही देऊ आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी लाथा मारू, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना केंद्र व राज्य सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.
दसरा मेळाव्यात ते म्हणाले की, देशभर कारभाराचा चिखल झाला आहे. मळच मळ दिसतो, कमळ कुठे दिसत नाही. स्वत: अच्छे दिनचे स्वप्न पाहणारे सरकार सामान्यांची झोप उडवत आहे. उद्धव यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. सहनशीलतेचा अंत पाहू नका. वाटेल त्या क्षणी निर्णय घेऊ, एवढाच काय तो इशारा ठाकरे यांनी दिला.
मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण गर्दीचा आकडा ओसरल्याचे दिसत होते. सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका उद्धव जाहीर करतील, या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिकांची निराशा झाल्याचे जाणवत होते.
आम्ही सत्तेत का आहोत असा सवाल करणाºयांना काश्मीर, बिहारमध्ये तत्वांशी तडजोड करून उपमुख्यमंत्रीपद घेतलेले कसे चालते?, असा सवाल करून,ठाकरे यांनी २५ वर्षांपासूनच्या मित्राला भाजपा संपवायला निघाल्याचा आरोप केला. संपवण्याचा प्रयत्न केल्यास देशच उसळेल असा इशारा त्यांनी दिला. सत्तेत राहून हिंदुत्व, महागाई, महिलारक्षण, शेतकºयांची कर्जमुक्ती यावर आमचे आंदोलन सुरूच राहील आणि ते चिघळेल, असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान वा कुणाविषयी आचकट विचकट घोषणा देऊ नका, ती आपली संस्कृती नाही.
...तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचू
भाजपाशी पटत नसूनही सत्तेत का आहात, असा सवाल आम्हाला केला जातो. हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी, सामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारवर अंकूश असावा. सत्तेत न रमता सत्ता सामान्यांसाठी राबवली गेली पाहिजे, म्हणून शिवसेना सत्तेत असल्याचे समर्थन ठाकरे यांनी केले. भ्रष्टाचार, काळा पैसा तसाच आहे. जनता महागाईने होरपळली आहे असे सांगून त्यांनी, पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोदींनी स्थिर ठेवले, तर आम्हीही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू’, असे विधान केले.
भागवत व जेटलींची केली प्रशंसा
म्यानमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय देण्यास विरोध केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची प्रशंसा केली. शिवसेनेचीही हीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.

पवारांसारखी अदृष्य साथ आम्ही देत नाही
आम्हाला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. मी त्यांच्यासारखी सरकारला लपूनछपून साथ देत नसतो.मी बाळासाहेबांचा शिष्य आहे. जे करतो ते उघड उघड. साथ उघडपणे देतो अन् लाथही उघडपणे मारतो.शिवसेना काय करते, त्यापेक्षा तुम्ही काय करता ते बघा. तुमच्यावरील जनतेचा विश्वास केव्हाच उडाला आहे, असे ठाकरे यांनी पवारांना सुनावले.

फुकटचा नागोबा
ट्रेनला विरोध दर्शवताना त्यांनी ही ट्रेन फुकटचा नागोबा असल्याची टीका केली. हा नागोबा पोसणार कोण? किती सामान्य माणसे या ट्रेनने जाणार आहेत? असा सवाल केला. आमच्या खांद्यावर मोदींचे हे ओझे टाकू नका, असे त्यांनी बजावले.

Web Title: Together with Lata - Married to Uddhav Thackeray, Prime Minister Narendra Modi and the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.