खग्रास चंद्रग्रहण; जगभर उत्साह! मुंबईकरांनी घेतला अपूर्व आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:26 AM2018-02-01T05:26:29+5:302018-02-01T05:28:02+5:30

‘सुपर-ब्लू-ब्लडमून’ पाहण्याचा अपूर्व आनंद बुधवारी मुंबईकरांनी लुटला. मैदाने, मोकळ्या जागा, इमारती आणि टॉवर्सच्या गच्चींवर सुपरमून पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती.

Tremendous lunar eclipse; Worldwide enthusiasm! Mumbaikars took unbeatable pleasure | खग्रास चंद्रग्रहण; जगभर उत्साह! मुंबईकरांनी घेतला अपूर्व आनंद

खग्रास चंद्रग्रहण; जगभर उत्साह! मुंबईकरांनी घेतला अपूर्व आनंद

googlenewsNext

मुंबई: ‘सुपर-ब्लू-ब्लडमून’ पाहण्याचा अपूर्व आनंद बुधवारी मुंबईकरांनी लुटला. मैदाने, मोकळ्या जागा, इमारती आणि टॉवर्सच्या गच्चींवर सुपरमून पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती.
सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येऊ लागल्याने चंद्रग्रहणास प्रारंभ झाला, परंतु मुंबईतून सुरुवातीला ग्रहण पाहता येत नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. सायंकाळी ६नंतर ढगांमुळे पुन्हा अडथळे आले. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होऊन ‘सुपर-ब्लू-ब्लड मून’चे दर्शन घडले. चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे असल्यामुळे त्यास ‘ब्लड मून’ म्हटले जाते. सायंकाळी ७.३८ वाजता खग्रास स्थितीची समाप्ती झाली व ८.४२ वाजता ग्रहण सुटले. ग्रहण काळात कृतिका, रोहिणी, मृग, आद्रा आणि पुनर्वसू ही पाचही नक्षत्रे पाहण्याचा योग आला. चंद्राच्या खग्रास स्थितीमुळे एकाच वेळी इतकी नक्षत्रे पाहायला मिळाली.

शिवाजी पार्क हाउसफुल्ल!

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सुपर मून पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. विविध खगोल अभ्यासक, विद्यार्थी व खगोलतज्ज्ञ एकत्र आल्याने, खगोलविषयक ज्ञानाची देवाण-घेवाण सुरू होती. मोठ्या दुर्बिणी घेऊन अनेक खगोल अभ्यासक सायंकाळी ५ वाजल्यापासूनच पार्कमध्ये ठाण मांडून बसले होते.

पुन्हा कधी? २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण
असा योग येईल. ३१ डिसेंबर २०२८ रोजी ब्लूमून आणि चंद्रग्रहण असा योग असणार आहे. ३१ जानेवारी २०३७ रोजी पुन्हा तिहेरी
योग आल्याने सुपर-ब्लू-ब्लड मूनचे दर्शन घेता येईल.

सोशल मीडियावर ‘अंधश्रद्धां’चे ग्रहण
अनेकांना या आगळ्यावेगळ्या चंद्राचा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. अनेकांनी ग्रहणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ग्रहणाच्या अनेक अफवाही ‘व्हायरल’ झाल्या होत्या.

- सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येऊ लागल्याने ्रग्रहणास प्रारंभ झाला. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होऊन ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’चे दर्शन घडले. ७.३८ वाजता खग्रास स्थितीची समाप्ती झाली व ८.४२ वाजता ग्रहण सुटले, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

- हे चंद्रग्रहण भारतातून खग्रास स्थितीत पाहायला मिळाले. मुंबईकरांना खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून पाहण्याचा तिहेरी योग आला.

-‘सूपर-ब्ल्यू-ब्लडमून’ पाहण्याचा अपूर्व आनंद बुधवारी जगभरातील नागरिकांनी घेतला.

Web Title: Tremendous lunar eclipse; Worldwide enthusiasm! Mumbaikars took unbeatable pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.