गोरेगावात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 11:24 AM2018-12-23T11:24:04+5:302018-12-23T12:44:39+5:30
गोरेगावातल्या पश्चिम भागातल्या मोतीलाल नगरमध्ये एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे.
मुंबई- गोरेगावातल्या पश्चिम भागातल्या मोतीलाल नगरमध्ये एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. ही इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. गोरेगावात ही दुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.
#Maharashtra: 1 person dead, 8 injured in the collapse of a portion of an under-construction building near Azad Maidan in Goregaon; NDRF present at the spot pic.twitter.com/xLpls8xOER
— ANI (@ANI) December 23, 2018
#Visuals#Maharashtra: 1 person dead, 8 injured in the collapse of a portion of an under-construction building near Azad Maidan in Goregaon; NDRF present at the spot pic.twitter.com/o97s8whGfj
— ANI (@ANI) December 23, 2018
गोरेगावातल्या म्हाडा वसाहतीत सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. 22 वर्षीय श्रवण कुमारचा मृत्यू झाला आहे, तर इतर सात जण जखमी आहेत. मंगल बनसा(35 वर्षं), मुन्ना शेख(30 वर्षं), शिनू (35 वर्षं), हरी वडार (3 वर्षं), शंकर पटेल(21 वर्षं), सरोजा वडार(24 वर्षं), रमेश निशाद (32 वर्षं) जखमींची नावे आहेत.