‘वंदे मातरम्’ सक्तीची मागणी जुनीच!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:47 AM2017-08-11T04:47:41+5:302017-08-11T04:47:41+5:30

पालिका शाळांमधून ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याची मागणी १९९८ साली शिवसेनेने केली होती. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी प्रतिकूल अभिप्राय दिल्याने तो ठराव बारगळला होता.

 'Vande Mataram' forced demand is old! | ‘वंदे मातरम्’ सक्तीची मागणी जुनीच!  

‘वंदे मातरम्’ सक्तीची मागणी जुनीच!  

Next

मुंबई : पालिका शाळांमधून ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याची मागणी १९९८ साली शिवसेनेने केली होती. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी प्रतिकूल अभिप्राय दिल्याने तो ठराव बारगळला होता.
भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांच्या पालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याबाबतच्या ठरावामुळे महापालिकेत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. १९९८ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक पराग चव्हाण यांनी पालिका शाळांमधून ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यघटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याविरुद्ध हा ठराव असल्याने अशी सक्ती करता येणे शक्य नसल्याचा, अभिप्राय तत्कालीन आयुक्तांनी दिला होता.
त्यानंतर पालिका शाळांमधून सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याची ठरावाची सूचना भाजपाच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये मांडली होती. त्यालाही मनसेसह विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला. या ठरावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यानंतर आता भाजपाकडून ‘वंदे मातरम्’ सक्ती करण्याची मागणी पुढे आली आहे.

समित्यांसाठीही मागणी

महापालिका सभागृह सुरू होण्याआधी ‘वंदे मातरम्’ म्हटले जाते. त्याचप्रमाणे पालिकेच्या सर्व वैधानिक समित्या, प्रभाग समित्या आणि विशेष समित्यांच्या सभेच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ म्हटले जावे, असेही पटेल यांनी ठरावाच्या मसुद्यात म्हटले आहे.

Web Title:  'Vande Mataram' forced demand is old!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.