पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधी

By admin | Published: June 26, 2017 01:21 AM2017-06-26T01:21:48+5:302017-06-26T01:21:48+5:30

लेय स्तरापासून आपण ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे’ हे शिकतो. त्याचबरोबरीने पशुधन आणि पशुव्यवसाय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालतात.

Veterinary field opportunities | पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधी

पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधी

Next

लेय स्तरापासून आपण ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे’ हे शिकतो. त्याचबरोबरीने पशुधन आणि पशुव्यवसाय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे बारावी विज्ञाननंतर पशुवैद्यकीय क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी माहिती घेऊ या. आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्रही नव्याने संशोधनात अग्रेसर ठरत आहे. कृषी विकासाचा विचार करता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. पशुधनात आणि दूध उत्पादनात जगात आपण सर्वोत्तम ठरलो आहोत. मित्रहो, पशुवैद्यकीय क्षेत्रमधील करिअरच्या संधी निश्चित फायद्याच्या ठरतील.
पशुवैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. केवळ जनावरांचा डॉक्टर या मानसिकतेतून बाहेर पडून विचार केल्यास, या क्षेत्राकडे व्यापक अर्थाने पाहता येईल. या क्षेत्रात संशोधनास अधिक वाव आहे. स्वत: व्यावसायिकरीत्या कार्यरत राहून अनेक जण उत्तमरीत्या काम करत आहेत. अलीकडे महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विकास अधिकारी या पदाच्या जागाही नियमितपणे भरल्या जातात. अन्न, औषध, इंडस्ट्रीतही कामाच्या संधी चांगल्या वेतनासहित उपलब्ध आहेत, तसेच केंद्र सरकारच्या संशोधन संस्थामध्ये नवनवीन संधी निर्माण होत असतात. चला तर मग नव्या वाटा चोखाळण्यास तयार व्हा.
कुठे उपलब्ध आहेत संधी?
पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधरांना करिअरच्या उत्तम संधी मिळतात. राज्य सरकारच्या पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये नोकरी मिळू शकते. खासगीरीत्याही व्यवसाय करता येऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये पाळीव प्राणी हा अनेक व्यक्तींच्या जिव्हाळ््याचा विषय झाला आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांचीही काळजी घेतली जाते. पाळीव प्राण्यांच्या देखभाल-तंदुरुस्तीकडे लोक काटेकोरपणे लक्ष देतात. त्यामुळे चांगल्या पशुवैद्यकांना उत्तम करिअर करता येऊ शकते. पशुवैद्यकास राज्यसेवा परीक्षा आणि केंद्रीय नागरी सेवांद्वारे अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारी प्रशासकीय नोकऱ्या मिळू शकतात. कृषी प्रक्रिया उद्योग, मोठे दुग्धप्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांतही संधी मिळू शकते. भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या अ‍ॅनिमल स्कॉड व अ‍ॅनिमल फार्मसची काळजी घेण्याकरिता दरवर्षी मुबलक संख्येमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना मागणी असते. याखेरीज सरकारी क्षेत्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पशुसंवर्धनविषयक धोरणांच्या अंमलबजावणीकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी असते.
- सचिन पाटील

Web Title: Veterinary field opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.