VIDEO - भारतातील पहिल्या फिल्म प्रदर्शनाला 121 वर्षे पूर्ण
By admin | Published: July 7, 2017 01:59 PM2017-07-07T13:59:03+5:302017-07-07T16:50:47+5:30
भारतीय लोकांच्या आयुष्यात आजच्या दिवसामुळे मोठी क्रांती झाली. ल्युमिएर बंधुंच्या सिनेमॅटोग्राफचा कार्यक्रम 121 वर्षांपुर्वी मुंबईत झाला
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.7- चित्रे, छायानृत्ये किंवा जत्रेमध्ये मॅजिक लॅंटर्नमध्ये चित्रे पाहण्याची सवय असलेल्या भारतीय लोकांच्या आयुष्यात 7 जुलै 1896 या दिवसामुळे मोठी क्रांती झाली. मुंबईच्या वॅटसन एस्प्लांड हॉटेलमध्ये फ्रेंच फिल्ममेकर ल्युमिएर बंधुंनी याच दिवशी काही चलतचित्राच्या फिल्म दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
ऑगस्ट मेरी लुईस निकोलस आणि लुईस जीन ल्युमिएर हे दोघे बंधु चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीच्या काही लोकांमधील एक म्हणून ओळखले जातात. लिओन बाऊलेने तयार केलेले सिनेमॅटोग्राफर यंत्र त्यांनी त्याच्या सर्व हक्कांसह विकत घेतले होते. या यंत्राच्या साहाय्याने त्या दोघांनी काही सेकंदांच्या फिल्म्स तयार करण्याचा सपाटा लावला. 26 डिसेंबर 1895 रोजी त्यांनी पॅरिसमध्ये पहिला चलतचित्रफित दाखवण्याचा तिकीट लावून पहिला कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी पॅरिसबाहेर जाऊन ब्रुसेल्समध्ये कार्यक्रम केला, मग मुंबई, मॉंट्रिआल, न्यू यॉर्क, ब्युनॉस आयर्स येथे त्यांनी हे कार्यक्रम केले.
वॅटसन हॉटेल बद्दलः ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम या चित्रफिती दाखवण्याचा कार्यक्रम केला ते वॅटसन हॉटेल मुंबईतील सर्वात जुन्या हॉटेलांपैकी एक आहे. 1869मध्ये बांधून पुर्ण झालेले हॉटेल मुंबईतील काळाघोडा परिसरामध्ये आहे. ख्यातनाम लेखक मार्क ट्वेन तसेच पाकिस्तानचे संस्थपक मोहम्मद अली जिना यांनी येथे वास्तव्य केले असून जिना येथे पूल खेळण्यास येत असत अशीही माहिती मिळते.
(व्हिडियो सौजन्य- युट्युब)