विवेक ओबेरॉयला राज्य महिला आयोग पाठवणार नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 05:59 PM2019-05-20T17:59:44+5:302019-05-20T18:01:37+5:30
मुंबई - अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दाखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल असे ...
मुंबई - अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दाखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या ओबेरॉय यांचे ट्विट महिलेचा अनादर करणारे आहे.
येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेलेत. अभिनेता विवेक ओबेरॉय हाही याला अपवाद नाही.
अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्वीटची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल. त्यांचे ट्वीट महिलेचा अनादर करणारे आहे...
— Maharashtra Women Commission (@mscw_bandra) May 20, 2019
: विजया रहाटकर,
अध्यक्षा, राज्य महिला आयोग @CMOMaharashtra@MahaDGIPR@vivekoberoipic.twitter.com/CP7Gee5i5X
अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा - नवाब मलिक