उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:20 AM2024-05-08T07:20:34+5:302024-05-08T07:20:55+5:30

उत्तर, उत्तर मध्य, उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांना मिळाली १५ पैकी ११ वेळा ५० टक्क्यांहून अधिक मते

Voters in the suburbs are generous, stingy in the city; What the numbers of all the constituencies in Mumbai say... | उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...

उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ मतदानाचा टक्का वाढविण्यातच नव्हे, तर एखाद्या उमेदवाराला भरभरून मतदान करून विजयी करण्यातही उपनगरातील रहिवाशांच्या तुलनेत शहरातील मतदार हात आखडता घेत असल्याचे दिसून येते. मुंबईत गेल्या पाच वर्षांतील लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास हे वास्तव दिसून येते.

उदाहरणार्थ, मुंबईच्या उपनगराचा भाग असलेल्या उत्तर, उत्तर मध्य आणि उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार १५ पैकी ११ वेळा ५० टक्क्यांहून अधिक मते घेऊन विजयी झाले आहेत. तुलनेत दक्षिण मध्य, उत्तर मध्य आणि दक्षिण मुंबईतील उमेदवार १५ पैकी केवळ ६ वेळा ५० टक्क्यांहून अधिक मते घेऊन जिंकून आले आहेत.

सर्वाधिक मते गोपाळ शेट्टींना 
मोदी लाटेत गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतून २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळेस अनुक्रमे ७० आणि ७१ टक्के मते मिळवून सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविला आहे. त्या खालाेखाल गजानन कीर्तिकर यांनी उत्तर पश्चिममधून २०१९ साली ६१ टक्के मते मिळविली होती.

मागील पाच लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची टक्केवारी

मुंबई उत्तर 
गोपाळ शेट्टी - (भाजप) - ७१ टक्के
गोपाळ शेट्टी - (भाजप) - ७० टक्के
संजय निरूपम - (काँग्रेस) - ३७ टक्के
गोविंदा (काँग्रेस) - ५० टक्के
राम नाईक (भाजप) - ५६ टक्के

मुंबई उत्तर पूर्व 
मनोज कोटक (भाजप) - ५६ टक्के
किरीट सोमय्या (भाजप) - ६० टक्के
संजय दिना पाटील (राष्ट्रवादी) - ३१ टक्के
गुरुदास कामत (काँग्रेस) - ५३ टक्के
किरीट सोमय्या (भाजप) - ४३ टक्के

मुंबई दक्षिण मध्य 
राहुल शेवाळे (शिवसेना) - ५३ टक्के
राहुल शेवाळे (शिवसेना) - ४९ टक्के
एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - ४३ टक्के
मोहन रावले (शिवसेना) - ३६ टक्के
मोहन रावले (शिवसेना) - ४७ टक्के


मुंबई उत्तर पश्चिम 
गजानन कीर्तिकर (शिवसेना) - ६१ टक्के
गजानन कीर्तिकर (शिवसेना) - ५२ टक्के
गुरुदास कामत (काँग्रेस) - ३५ टक्के
सुनील दत्त (काँग्रेस) - ५२ टक्के
सुनील दत्त (काँग्रेस) - ५२ टक्के

मुंबई उत्तर मध्य 
पूनम महाजन (भाजप) - ५३ टक्के
पूनम महाजन (भाजप) - ५६ टक्के
प्रिया दत्त (काँग्रेस) - ४८ टक्के
एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - ४९ टक्के
मनोहर जोशी (शिवसेना) - ५५ 

मुंबई दक्षिण 
अरविंद सावंत (शिवसेना) - ५२ टक्के
अरविंद सावंत (शिवसेना) - ४८ टक्के
मिलिंद देवरा (काँग्रेस) - ४२ टक्के
मिलिंद देवरा (काँग्रेस) - ५० टक्के
जयवंतीबेन मेहता (भाजप) - ४७ टक्के

Web Title: Voters in the suburbs are generous, stingy in the city; What the numbers of all the constituencies in Mumbai say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.