राईट टू पी साठी आंदोलन करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 06:21 PM2017-11-19T18:21:55+5:302017-11-19T18:23:08+5:30
मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची वानवा आहे. त्यामुळे आज शौचालय दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
मुंबई - मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची वानवा आहे. त्यामुळे आज शौचालय दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही वेळाने या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
राईट टू पी च्या कार्यकर्त्यांनी आज शौचालय दिनानिमित्ताने मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी गेल्या असता, मुमताज शेख ,सुप्रिया सोनार, संगीता कांबळे, निकिता चव्हाण पोळ,उषा देशमुख, अंजुम शेख, भारती मोहिते, संध्या यादव,अलका उमापे, मीनाक्षी आढाव येथे मलबार हिल पोलिसांनी वरील कार्यकर्त्यांना अटक केले होते. यावेळी शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनला जाऊन सदरील कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली व महिलांसाठी स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर मी तुमच्या चळवळीसोबत आहे असे सांगीतले. यानंतर काही क्षणातच पोलिसांनी वरील कार्यकर्त्यांना समज देऊन तत्काळ सोडून दिले. यावेळी मलबार हिल पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, विजय सावंत पोलीस सह निरीक्षक नीतू तावडे उपस्थित होत्या.