योग विद्या निकेतनच्या सहसंस्थापक शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 09:16 PM2018-09-22T21:16:02+5:302018-09-22T21:16:43+5:30

श्रीमती शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे वयाच्या ९१व्या वर्षी दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी 'योग भवन 'वाशी येथे निधन झाले. 

Yog Vidya Niketan co-founder Shakuntala Sadashiv Nimbalkar passed away | योग विद्या निकेतनच्या सहसंस्थापक शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे निधन

योग विद्या निकेतनच्या सहसंस्थापक शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे निधन

googlenewsNext

मुंबई :  गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ योगविद्या घरोघरी पोहोचविण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या, योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर गुरुजींच्या उच्चविद्याविभूषित, कर्तबगार पत्नी आणि  योग विद्या निकेतनच्या सहसंस्थापक, माजी विश्वस्त व बृहन्मुंबई महानगरपालिकेतून उपशिक्षणाधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या आदर्श शिक्षिका श्रीमती शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे वयाच्या ९१व्या वर्षी दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी 'योग भवन 'वाशी येथे निधन झाले. 

' नवी मुंबई भूषण ', 'योगरत्न' , 'यमुनाई मातृवंदन', 'योविनि प्रेरणाशक्ती',अशा अनेक पुरस्कारांनी गौरविलेल्या शकुंतला निंबाळकर यांच्या  मागे त्यांचे पती व योग विद्या निकेतनचे  संस्थापक पद्मश्री  सदाशिव निंबाळकर ,मुलगा  दिपक, मुलगी श्रीमती भारती, सून रुपाली, नातवंडे आणि योविनि लाखो योगसाधक व योगप्रेमी असा मोठा परिवार आहे.

अंत्यदर्शन - योग भवन,प्लॉट नं.१४, सेक्टर ९ ए ,योग विद्या निकेतन चौक ,वाशी, नवी मुंबई येथे सोमवार,दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ६.३० ते ८.०० व त्यानंतर ८.०० वाजता अंत्ययात्रा निघेल. 

Web Title: Yog Vidya Niketan co-founder Shakuntala Sadashiv Nimbalkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.