डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के मृत्यू
By admin | Published: March 31, 2016 03:12 AM2016-03-31T03:12:14+5:302016-03-31T03:12:14+5:30
अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
‘व्हीएसपीएम’ दंत महाविद्यालय : सीएमई व वेबिनार कार्यक्रम
नागपूर : अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
हिंगणा रोडवरील ‘व्हीएसपीएम’च्या दंत महाविद्यालय व संशोधन केंद्रातर्फे बुधवारी ओरल व मॅक्सिल्लोफेसियल विभागात सीएमई व वेबिनार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून विविध विषयांवर सखोल माहिती सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एमजीएम दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या ओरल अॅन्ड मॅक्सिल्लोफेसियल विभागाचे प्रा. डॉ. जे. एन. खन्ना यांनी ‘जायगोमॅटिक कॉमेक्सिलरी ओरबिटल कॉम्प्लेक्स फिचर्स’, एसपीडीसी वर्धाच्या ओरल अॅन्ड मॅक्सिल्लोफेसियल विभागाचे प्रा. राजीव बोरले यांनी ‘कोडिंलर फ्रॅक्चर’, तर न्यूरॉन रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गिरी यांनी डोक्यावर आघात झाल्यानंतर मेंदूची हालचाल व उपचारावर मार्गदर्शन केले. यानंतर गटचर्चा झाली. त्यात तज्ज्ञांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्समधील अॅनेस्थिशिया विभागाच्या प्रा. डॉ. गुंजन बडवाईक यांनी एअरवे व्यवस्थापन, प्लास्टिक अॅन्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभागाचे प्रा. मनीष झाडे यांनी सॉफ्ट टिश्यू इन्ज्युरी, तर रेडिओ डायग्नोसिस विभागाच्या प्रा. डॉ. विजया कांबळे यांनी रेडिओ इमेजिंगवर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एस. आर. शेनॉय यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. अमोल देशमुख व डॉ. उषा रडके यांनीही विचार व्यक्त केले.
डॉ. नीलिमा बुधराजा यांनी संचालन केले तर, डॉ. क्षितिज बंग यांनी आभार मानले. कार्यक्रमात नागपूर, वर्धा, अमरावती व जबलपूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)