महाआरोग्य शिबिरात १५७६ नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:04 PM2018-03-24T23:04:22+5:302018-03-25T01:10:57+5:30
जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १५७६ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात सहा पुरुष व दोन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर पाच महिला स्तन कर्करोगाच्या संशयित आढळून आल्या. १२ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचा तर २२५ महिला व पुरुषांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन त्यांना मेडिकलमध्ये बोलविण्यात आले. समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १५७६ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात सहा पुरुष व दोन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर पाच महिला स्तन कर्करोगाच्या संशयित आढळून आल्या. १२ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचा तर २२५ महिला व पुरुषांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन त्यांना मेडिकलमध्ये बोलविण्यात आले. समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लोकमत व जैन सहेली मंडळ, नागपूरद्वारा आयोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने ‘श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अॅन्ड वेल्फेअर सेंटर’ बुटीबोरी येथे शनिवारी महाआरोग्य शिबिर पार पडले. यात बुटीबोरी, एमआयडीसीसह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवित आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष निलेश सिंह, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, बुटीबोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत चांदेवार, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा उपस्थित होत्या.
शिबिराचा समारोप आमदार समीर मेघे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन.के. नायक उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शिबिराला काँग्रेसचे नेते मुजीब पठाण, बुटीबोरी इंडस्ट्रीजचे मिलिंद कानडे, सचिन अग्रवाल, युवराज व्यास यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत वरिष्ठ विपणन व्यवस्थापक मुश्ताक शेख, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक सुमेध वाघमारे, जिल्हा प्रतिनिधी गणेश खवसे, लोकमतचे इव्हेंट मॅनेजर आतिष वानखेडे व सखी मंचच्या नेहा जोशी यांनी केले.
शिबिरातून रुग्ण, डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशिलता वाढते -डॉ. निसवाडे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले, आरोग्य शिबिराचा लाभ केवळ रुग्णांनाच होतो असे नाही याचा फायदा डॉक्टरांनाही होतो. डॉक्टर समाजशील होतात. विशेष म्हणजे, रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढते. नुकत्याच कामठीत झालेल्या आरोग्य शिबिरातील १४००वर रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याही शिबिरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची व पुढील उपचाराची गरज असेल त्यांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या चार वर्षात मेडिकलमध्ये झालेला कायापालट आता दिसून येऊ लागला आहे. किडनी प्रत्यारोपण, ट्रॉमा सेंटर, पेडियाट्रिक सजर्रीसह सर्वच विभागात झालेल्या बदल व मदतीला असलेल्या अद्ययावत उपकरणांमुळे याचा फायदा रुग्णांना होत आहे. परिणामी, रुग्णांच्या संख्येत तीनपट वाढ झाली आहे. मेडिकलमध्ये लवकरच रुग्णांच्या सेवेत भारतातील दुसरे स्पाईन इन्जुरी सेंटर, कॅन्सर इन्स्टिटय़ूट व लंग्स इन्स्टिटय़ूट असणार आहे.
दुर्गम भागात प्री-कॅन्सरचे अधिक रुग्ण-डॉ. गणवीर
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर म्हणाल्या, ज्योत्स्ना दर्डा यांनी सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविले. असे सामाजिक उपक्रम त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. दंत रोग म्हणजे केवळ दाताशी संबंधितच रोग नाही तर मुखाशी संबंधित कॅन्सरपासून तर इतरही रोगावर उपचार केले जातात. रुग्णालयाने नुकतेच शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोलीतील दुर्गम भागातील ७६ वसतिगृहामधील १६ हजार विद्याथ्र्याची तपासणी केली. यात सहाव्या वर्गापासून ते पदवीच्या विद्याथ्र्यामधील सुमारे ६६ टक्के विद्यार्थी खर्रा खात असल्याचे आढळून आले. या विद्याथ्र्यापैकी ८०० विद्याथ्र्यामध्ये मुखपूर्व कर्करोग आढळला. प्राथमिक अवस्थेतील असलेला कॅन्सर दूर करण्यासाठी दंत रुग्णालयाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
गरिबांची रुग्णसेवा हीच जनसेवा- समीर मेघे
नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणा:या ज्योत्स्नाभाभी आजही स्मरणात आहे. त्यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित करण्यात येणा:या या शिबिरात खंड पडू देऊ नका, असे आवाहन करीत समीर मेघे म्हणाले, गावखेडय़ात जाऊन गरीब रुग्णांची सेवा करणो हीच खरी जनसेवा आहे. काही रुग्णांना शहरात जाऊन उपचार घेणो परडवणारे नसते. यामुळे अशा शिबिरातून त्यांना आरोग्याची मोठी मदत मिळते. या शिबिरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची गरज आहे त्यांनी माङयाशी संपर्क साधावा. त्यांच्यावर शासनाच्या विविध योजनांर्तगत उपचार केले जातील, असेही ते म्हणाले.
व्यसनांपासून तरुणाईला रोखा-नितीन लोणकर
बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर म्हणाले, देशात २०२२ पर्यंत २८ ते २९ वयोगटातील तरुणाईची संख्या ही लक्षणीय असणार आहे. त्या तरुणाईचा विधायक कार्यासाठी वापर केला तर आपला देश हा जगात महाशक्तिशाली बनू शकतो. या तरुणाईला व्यसनांपासून रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनीच कार्य करावे.
महिलांमध्ये व्हावी आरोग्य जनजागृती - माधुरी बोरा
जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा म्हणाल्या, जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांनी अनेक समाजहितोपयोगी उपक्रम राबविले. महिलांच्या उत्थानासाठी त्यांचे कार्य अतुलनीय आहे. महिलांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले. आरोग्य शिबिराच्यामाध्यमातून आजाराचे निदानच होत नाही तर महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती होते.
अचानक हृदय बंद पडले तर...
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तात्काळ उपाययोजना केल्यास मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात कमी करता येते. याची प्रात्याक्षिकातून माहिती देण्यासाठी मेडिकलच्या बधिरीकरणशास्त्र विभागाने पुढाकार घेत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी या आरोग्य शिबिरात बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे आणि त्यांच्या चमूने ‘मॅनीकीन’चा वापर करून त्यावर प्रात्याक्षिक देऊन उपस्थितांकडूनही करूनही घेतले. डॉ. विशाल बोकडे यांनी सहकार्य केले.
मेडिकल, दंत रुग्णालय व बोरखेडी प्रा. आरोग्य केंद्राने दिली सेवा
या शिबिराला मेडिकलचे जनसंपर्क अधिकारी गिरीश भुयार, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. सी.एम. अतकर, डॉ. अभिषेक पांडे, डॉ. पंकज नवघरे, डॉ. श्याम मेडा, डॉ. अतुल डोंगरे, डॉ. मयुर सातई, स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे डॉ. स्मृती गेडाम, डॉ. मेधा दविले, बालरोगशास्त्र विभागाचे डॉ. उर्मिला चव्हाण, डॉ. उमेश बियाणी, डॉ. लक्ष्मीकांत रोहाडकर, रेडिओथेरपी विभागाचे डॉ. विजयकुमार महोबिया, डॉ. सौरभ मेश्राम, अस्थिरोगशास्त्र विभागाचे डॉ. इशांत घुसे, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. अमोल धोरण, त्वचारोग विभागाचे डॉ. प्रणीता डवरे, डॉ. प्रीतिका देवनाथ, नेत्रचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. प्रतीक विश्वकर्मा, डॉ. अविनाश पुरी, डॉ. स्वानंद प्रधान, डॉ. मोहित हर्षे, हृदयरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. पी. देशमुख, डॉ. अनुप पुसाटे, डॉ. अतुलसिंग राजपूत, कान, नाक व घसा विभागाचे डॉ. आशिष केचे, डॉ.दिनेश वेलमुरगन, क्षयरोग व उररोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, डॉ. पंकज घोलप, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे शशांक राठोड, शुभम शेंडे, राहुल शेंडे, श्रेया बागडिया, श्रुती तागडे, विपुल शुक्ला, सोनल गुप्ता, सुबोध सरदार, सूची बन्सोड, श्वेता गाडेकर, नर्सिंग विभागाच्या कुंदा मेश्राम, पुष्पलता चौधरी, डॉली राऊत, वैभव गुलदेवकर, प्रवीण वहाने, सामाजिक अधीक्षक वैद्यकीय पौर्णिमा घवघवे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. अभय दातारकर, डॉ. सुभाष कुंभारे, डॉ. वसुंधरा भड, डॉ. बालाजी शेंद्रे, डॉ. सचिन खत्री यांच्यासह डॉ प्रकाश बंडीवार, डॉ. महेश सानप, डॉ. शिवानी समर्थ, डॉ. प्रिया चड्डा, डॉ. प्राजक्ता पराते, डॉ. मिनल टेंभूर्णे, डॉ. मोहिनी पाटील, डॉ. अनुप शेवते, डॉ. रोषिता सिंह, डॉ. राजू तिजारे, बोरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. संजय गुंजनवार, डॉ. राम लांबट, नेत्रचिकित्सक जितेंद्र अनकर, राजश्री वाघोदे, सुनील श्रीगिरीवार, भैया रेवतकर, मेडिकलचे कर्मचारी, राहुल पाटील, सुधाकर लोखंडे आदींचे सहकार्य मिळाले. या शिबिराला रायसोनी ग्रुपचे विशेष सहकार्य मिळाले.