नागपुरात आॅटोचालकाची भीषण हत्या : आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 07:50 PM2018-11-09T19:50:45+5:302018-11-09T19:52:24+5:30

खरबी चौकाजवळ आॅटो चालविणाऱ्यांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. आरोपी आॅटोचालकानी विरोधी गटातील आॅटोचालकाची दिवसाढवळ्या हत्या करून त्याचा अर्धमेल्या अवस्थेतील मृतदेह चौकात आणून फेकला. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या थराराने नंदनवनमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Accused of murder of autocrat in Nagpur: accused absconding | नागपुरात आॅटोचालकाची भीषण हत्या : आरोपी फरार

नागपुरात आॅटोचालकाची भीषण हत्या : आरोपी फरार

Next
ठळक मुद्देनंदनवनमधील खरबी चौकात थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरबी चौकाजवळ आॅटो चालविणाऱ्यांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. आरोपी आॅटोचालकानी विरोधी गटातील आॅटोचालकाची दिवसाढवळ्या हत्या करून त्याचा अर्धमेल्या अवस्थेतील मृतदेह चौकात आणून फेकला. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या थराराने नंदनवनमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. राजू ऊर्फ राजेंद्र नारायण देशमुख (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो खरबी चौकात आॅटो चालवित होता.
नंदनवनमधील या भागात आॅटो चालविणाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या व्यावसायिक स्पर्धेने वादाचे रूप घेतले आहे. त्यामुळे एकमेकांना टोमणे मारणे, शिव्या घालणे, बाचाबाची करणे, असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास याच वादातून राजू देशमुख आणि त्याचा साथीदार चंदू या दोघांनी नीरज चटोले (वय ३८, रा. गंगा लेआऊट, नंदनवन) याला माँ गंगा सेलिब्रेशन हॉलसमोर लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. डोक्याला दुखापत झाल्याने चटोलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी राजू आणि चंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेने आॅटोचालकांमधील वादाचे स्वरूप तीव्र झाले.
या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास आरोपी आॅटोचालक पक्या आणि पांग्या या दोघांनी त्यांच्या आॅटोतून राजू देशमुखला खरबी चौकात फेकले आणि पळून गेले. राजूच्या शरीरावर चाकूचे घाव होते. तो शेवटचे आचके देत होता. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत जमलेल्या बघ्यांपैकी एकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच नंदनवनचे गस्तीवरील पथक तेथे पोहचले. त्यांनी जखमी राजूला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कुठे मारले, त्याची शोधाशोध
दिवसाढवळ्या वर्दळीच्या चौकात आॅटोचालकांनी विरोधी गटातील आॅटोचालकाची हत्या केल्याचे कळल्याने पोलीसही हादरले. नंदनवनचा पोलीस ताफा, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह अनेकांनी तेथे धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर आरोपी हाती लागले नव्हते. आरोपींनी राजूला कुठे पकडले, त्याच्यावर कोणत्या ठिकाणी घाव घातले, ते आरोपीच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त भरणे यांनी लोकतमशी बोलताना दिली.

 

 

 

Web Title: Accused of murder of autocrat in Nagpur: accused absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.