किटकनाशक मृत्यूप्रकरणी कृषी मंत्रालय दोषी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:56 AM2017-10-23T10:56:51+5:302017-10-23T11:06:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध मुद्यांवरुन भाजपावर सरकारवर चौफर टीका केली आहे.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध मुद्यांवरुन भाजपावर सरकारवर चौफर टीका केली आहे.
'बंदी असलेली किटकनाशकं बाजारात आल्यानं बळी'
किटकनाशक नियंत्रणासाठी कायदा आहे व संस्थादेखील आहे. संस्थेच्या परवानगीशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊ शकत नाही. आम्ही आमच्या काळात नियमांचे काटेकोर पणे पालन केले. गेल्या 3 वर्षात काय झाले माहित नाही. या प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
'नियोजनाशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप'
कर्जमाफी नियोजनशून्य पद्धतीने झाली. कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना पत्र आली. सुधारणा करण्यासाठी शासनाला 15 दिवसांचा वेळ देऊ,नाहीतर पुढील दिशा ठरवू, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.
'नियमात अडकून न पडता शेतकऱ्यांना करा मदत'
परतीच्या पावसामुळे विदर्भात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे . केंद्र व राज्य शासनाने नियमात अडकून न पडता शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे . यासंदर्भात राज्य शासनाशी बोलणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वादावर काहीच भाष्य करणार नसल्याचे सांगितले.