मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:01 PM2017-12-22T21:01:45+5:302017-12-22T21:02:30+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.

Announce compensation to the casualties / casualties on Mumbai-Goa highway; Shivsena MLA aggressor | मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

Next
ठळक मुद्देआठ दिवसात बैठकीचे सरकारचे आश्वासन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने या अपघातांची जबाबदारी घेऊन अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. चंद्र्रकांत पाटील यांच्याकडून हा महामार्ग जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत असले तरी या डेडलाईनवर विश्वास नाही. यामध्ये झालेल्या अपघातांत ६५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का, असा सवाल भोईर यांनी केला.
सार्वजनिक बांधकाम खात्याने १६-१७ सालची दिलेली मुदत संपली आता २०१८ ची डेडलाईन दिली जात आहे. या डेडलाईनमध्ये कामे होतील का? इंदापूर-पळस्पेपर्यंत कितीतरी अपूर्ण कामं आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते, त्याने काय काम केले ते सांगा? या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका? जे काम पाच वर्षांत करू शकले नाहीत ते काम कसे पूर्ण होणार, असा सवाल भरत गोगावले यांनी केला.
पनवेलपासून इंदापूरपर्यंत ८४ किमीचा रस्ता आहे. येथील कंत्राटदार जर नादार झाला असेल तर त्याच्याकडून कंत्राट काढून घ्यायला हवे. यासाठी सरकारने हायकोर्टात जाऊन खटला भरायला हवा. पण कंत्राटदाराला पाठीशी घातले जातेय. आणखी किती जीवांशी खेळणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला. कोकणात आमची गावे असल्याने आम्ही आमदार तिथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला प्रश्न करतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहिल्यानंतर आम्हाला कोकणात जायला लाज वाटते, अशी खंत करतानाच गगनबावडा ते वैभववाडी या रस्त्याची परिस्थिती मृत्यूच्या खाईतून चाललोय अशी झाली असल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. कोकणात जाण्यासाठी पर्याय असलेले एक्स्प्रेस वे तसेच अन्य रस्ते तरी चांगले करा, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

Web Title: Announce compensation to the casualties / casualties on Mumbai-Goa highway; Shivsena MLA aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.