अयोध्येतील ती जागा राम जन्मभूमीच, मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा - मोहन भागवत  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 05:49 PM2018-11-25T17:49:13+5:302018-11-25T17:53:00+5:30

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे.  तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा.

Ayodhya is Shri Ram's Place, the government should make laws for the temple - Mohan Bhagwat | अयोध्येतील ती जागा राम जन्मभूमीच, मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा - मोहन भागवत  

अयोध्येतील ती जागा राम जन्मभूमीच, मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा - मोहन भागवत  

ठळक मुद्दे न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावाहा देश रामाचा आहे. बाबर आपल्या देशाचा नव्हताराम जन्मभूमीबाबत न्यायालयाची प्राथमिकता आहे,असे वाटत नाही

नागपूर - अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे.  तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तसेच राम मंदिराच्या कायद्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहानही मोहन भागवत यांनी केले. 
विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या हुंकार सभेला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले, त्यावेळी भागवत म्हणाले, ''हा देश रामाचा आहे. बाबर आपल्या देशाचा नव्हता, राम आपला आहे. त्यांचे मंदिर बनणार नाही तर कसे होणार. हिंदू समाज सर्वांचा आदर करतो. म्हणूनच 30 वर्ष लागत आहेत. राम जन्मभूमीबाबत न्यायालयाची प्राथमिकता आहे,असे वाटत नाही. सर्वाना वाटते मंदिराचे काम सुरु व्हावे. पण साधी सुनांवणी सुरु होत नाही.जनहितासाठी हा मुद्दा टाळत राहणे योग्य नाही.''

भागवत म्हणाले, अयोध्येतील त्या जागेवर केलेल्या खोदकामामध्ये त्या ठिकाणी मंदिर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे.  न्याय देण्यात विलंब करणे म्हणजेच टाळणे होय. २०१० साली न्यायालयाने  न मागता जागेची वाटणीही केली.'' असा आरोपही भागवत यांनी केले.

राम मंदिराचे प्रकरण राजकीय नाही. कुणाला सत्तेवत आणण्यासाठी हे नाही. तरीही हे होत नाही. या प्रकरणाला प्राथमिकता दिली जात नाही। तेथेमंदिर होते, मालकी कुणाची यावर न्यायालय निर्णय देणार नाही. जन्मभूमीवर दुसरा कुणी मालकी कशी सांगू शकतो,''असेही भागवत पुढे म्हणाले. 
 

Web Title: Ayodhya is Shri Ram's Place, the government should make laws for the temple - Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.