नागपुरातील सदरमध्ये आढळला सलूनच्याआड कुंटनखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:51 AM2019-02-23T00:51:06+5:302019-02-23T00:53:14+5:30

सलूनच्या आड चालविल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारून बबिता बोरकर (वय ३८) नामक महिलेला ताब्यात घेतले.

Brothel found in Salons at Sadar in Nagpur | नागपुरातील सदरमध्ये आढळला सलूनच्याआड कुंटनखाना

नागपुरातील सदरमध्ये आढळला सलूनच्याआड कुंटनखाना

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलूनच्या आड चालविल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारून बबिता बोरकर (वय ३८) नामक महिलेला ताब्यात घेतले.
सदर मधील मंगळवारी कॉम्प्लेक्सच्या बाजूला एका इमारतीत बबिता युनिसेक्स सलून चालवित होती. तेथे ती देहव्यवसाय चालवित असल्याची माहिती कळताच एसएसबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बबितासोबत पोलिसांनी पाठविलेल्या ग्राहकाने संपर्क साधला. तिने ४ हजारात वेश्याव्यवसाय करणारी तरुणी उपलब्ध करून देण्यााची तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे बबिताने ग्राहकाकडून रक्कम घेऊन त्याला एक तरुणी उपलब्ध करून देताच शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी तेथे छापा मारला. पोलिसांनी तेथून बबितासह दोन तरुणींना ताब्यात घेतले. बबिताची सदर ठाण्यात वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू होती.

 

 

Web Title: Brothel found in Salons at Sadar in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.