देशाला गांधीवादी विचारांची गरज : लीलाताई चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:33 AM2019-01-31T01:33:14+5:302019-01-31T01:34:07+5:30

सध्याच्या परिस्थितीत देशाला गांधीवादी विचारांची आवश्यकता आहे. देशातील सर्वधर्मसमभावाची भावना गांधीजींनी आपल्या जीवन शैलीतून व त्यागातून आपल्या देशाला दिली. त्याच विचाराची सध्या देशाला गरज आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे यांनी व्यक्त केले. गांधी विचारधारेला अनुसरून सतत देशसेवा करीत राहा, असे आवाहनही त्यांनी केले.

The country needs Gandhian thought: Leelatai Chitale | देशाला गांधीवादी विचारांची गरज : लीलाताई चितळे

देशाला गांधीवादी विचारांची गरज : लीलाताई चितळे

Next
ठळक मुद्देशहर काँग्रेसतर्फे गांधी पुण्यतिथी

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याच्या परिस्थितीत देशाला गांधीवादी विचारांची आवश्यकता आहे. देशातील सर्वधर्मसमभावाची भावना गांधीजींनी आपल्या जीवन शैलीतून व त्यागातून आपल्या देशाला दिली. त्याच विचाराची सध्या देशाला गरज आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे यांनी व्यक्त केले. गांधी विचारधारेला अनुसरून सतत देशसेवा करीत राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी व जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रार्थना सभेचे आयोजन व्हेरायटी चौकातील पूर्णाकृती गांधी पुतळ्यासमोर बुधवारी करण्यात आले. देशभक्तीपर गाणे व भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी, लीलाताई चितळे, केशवराव शेंडे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आ. यादवराव देवगडे, विशाल मुत्तेमवार, त्रिशरण सहारे, प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड. अभिजित वंजारी, प्रदेश चिटणीस अतुल कोटेचा, माजी अध्यक्ष शेख हुसैन, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, महिला अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, नगरसेवक संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड आदी यावेळी उपस्थित होते.
हरिभाऊ केदार म्हणाले, महात्मा गांधींसारखा थोर पुरुष या भूतलावर कधीही होणार नाही. एकमेव असे महात्मा गांधी संपूर्ण जगामध्ये अहिंसेचे पुजारी म्हणून त्यांची प्रतिमा आढळून येते. जनमानसांनी त्यांचे विचार आपल्या जीवनात वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नितीश ग्वालवन्शी, उज्ज्वला बनकर, हर्षला साबळे, नेहा निकोसे, भावना लोणारे, देवा उसरे, सुजाता कोंबाडे, रेखा बाराहाते, प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, जयंत लुटे, दयाल जशनानी, शिवनाथ शेडे, विलास भालेकर, माजी आ. यशवंत बाजीराव, डॉ. विठ्ठल कोंबाडे, नरेश सिरमवार, योगेश तिवारी, अरविंद वानखेडे, प्रशांत धाकने, मनोज साबळे, नवीन सहारे, डॉ. रिचा जैन, विवेक निकोसे, प्रवीण गवरे, युगल विदावत, इरशाद अली, श्रीकांत ढोलके, देवेंश गायधने, जॉन थॉमस, संजय सरायकर, राजेश नंदनकर, डॉ. प्रकाश ढगे आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी महात्मा गांधींच्या पूर्णाकृती प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. ज्येष्ठ गांधीवादी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी केले.

Web Title: The country needs Gandhian thought: Leelatai Chitale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.