गडरच्या खड्डयात दबून मजुराचा मृत्यू, अधिकारी-कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 03:20 PM2017-11-07T15:20:24+5:302017-11-07T15:21:05+5:30

गडर लाईनचे काम मजुरांकडून करवून घेताना महापालिका प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे एका मजुराचा मृत्यू झाला.

The death of the laborer in the Ghadar pothole, negligence of the official-contractor | गडरच्या खड्डयात दबून मजुराचा मृत्यू, अधिकारी-कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

गडरच्या खड्डयात दबून मजुराचा मृत्यू, अधिकारी-कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

Next

नागपूर - गडर लाईनचे काम मजुरांकडून करवून घेताना महापालिका प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे एका मजुराचा मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमकारनगरात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली. 

ओमकारनगर चौकाजवळच्या हरिओम कॉलनीत पाईपलाईनचे आणि गडर लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता तेथे अरविंद ईनवाती (वय २५) आणि चेतन ईनवाती (वय ५०, रा. मुल सारंगपूर लखनादौन, जि. शिवनी) हे काम करीत होते. काम करता-करता अचानक मातीचा ढिगारा खचल्याने ते दोघेही खड्डयात पडले आणि वरून त्यांच्या अंगावर माती पडल्याने ते दबले. आजुबाजुच्यांपैकी एकाला मजूर खड्डयात पडताना दिसल्याने त्याने आरडाओरड करून नागरिकांना जमविले. ओलसर मातीखाली ते दबल्याने त्यांना काढणे जमणार नाही, हे लक्षात आल्यामुळे एकाने अग्निशमन दल आणि दुस-याने अजनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तेथे पोलीस आणि अग्निशमन दलाचा ताफा पोहचला. तोपर्यंत तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दीड तास परिश्रम घेतल्यानंतर दोघांनाही बाहेर काढले. मात्र, अरविंदचा मृत्यू झाला होता. गंभीर अवस्थेतील चेतन ईनवातीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहे.  संतपाल संतोष इनवाती (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
 

कंत्राटदाराला अटक अधिका-यांची पाठराखण ? 
धोक्याच्या ठिकाणी गरिब मजुरांना कामावर जुंपताना ब-याच ठिकाणांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केली जात नाही. या ठिकाणी देखिल असाच प्रकार घडला. त्यामुळे जमावाने महापालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराच्या नावे मोठी ओरड केली होती. या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही लावून धरली होती. पोलिसांनी ही बाब लक्षात घेता हलगर्जीपणाच्या आरोपाखाली कंत्राटदार आरोपी संजय किसन पिसे (वय ४४, रा.  निर्मलनगर) आणि या कामाच्या ठिकाणी सपुरविजन कररणारा परमेश्वर मधुकर हटवार (वय ४६, रा. गणेशनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटकही करण्यात आली. महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिका-यांची मात्र पोलिसांनी पाठराखन केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा तसेच मृत व जखमीच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत द्या, अशी मागणी होत आहे. 

Web Title: The death of the laborer in the Ghadar pothole, negligence of the official-contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.