अपंगत्व त्याला रोखू शकले नाही

By admin | Published: May 26, 2016 02:51 AM2016-05-26T02:51:45+5:302016-05-26T02:51:45+5:30

सामान्य विद्यार्थ्यांचे यश महत्वाचे असतेच. मात्र शारिरीक दुबळेपणा असताना त्यावर मात करुन यशस्वी होणाऱ्यांची मेहनत डोळ््यात भरणारीच असते.

Disability could not prevent him | अपंगत्व त्याला रोखू शकले नाही

अपंगत्व त्याला रोखू शकले नाही

Next

प्रेषितला व्हायचे आहे अभियंता : अपंग विद्यार्थ्यांतून नागपुरातून टॉपर
निशांत वानखेडे नागपूर
सामान्य विद्यार्थ्यांचे यश महत्वाचे असतेच. मात्र शारिरीक दुबळेपणा असताना त्यावर मात करुन यशस्वी होणाऱ्यांची मेहनत डोळ््यात भरणारीच असते. दोन्ही हाताने अपंग असलेल्या प्रेषितनेही जिद्द आणि मेहनतीच्या भरवशावर असेच डोळ््यात भरण्यासारखे यश बारावीच्या परीक्षेत मिळविले आहे. प्रेषितने विज्ञान शाखेत तब्बल ८९.६९ टक्के गुण मिळवून अपंग विद्यार्थ्यांमध्ये नागपुरातून ‘टॉप’ राहण्याचा मान पटकावला आहे. त्याचे हे यश अपंगत्व रोखू शकले नाही.
पे्रषित इतर मुलांसारखा सामान्य नाही. मात्र त्याचे माणसिक बळ सामान्य व्यक्तीपेक्षा अफाट आहे. त्यामुळेच शरीराचे अपंगत्व त्याला यशापासून रोखू शकले नाही. प्रेषित वाखले हा अमरावतीचा राहणारा. त्याचे वडिल प्रदीप वाखले मेळघाटातील एका शाळेत शिक्षक आहेत. १० व्या गर्वातही चांगले मार्क्स मिळविलेल्या प्रेषितला विज्ञान विषय निवडीत द्विलक्षी अभ्यासक्रमात नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश मिळविला. प्रेषित रामदासपेठ येथे त्याची आई प्रांजली यांच्यासमवेत खोली करुन राहायचा. प्रेषितचे दोन्ही हात ७० टक्के अपंग आहेत. कॉलेजनंतर सायंकाळी गणिताची शिकवणी लावली होती. मात्र त्याचा अधिक भर कॉलेजमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनावर असल्याचे त्याने सांगितले.
दररोज रात्री चार ते पाच तास अभ्यास करण्याचे वेळापत्रक ठरविले होते. त्यानुसार त्याने मेहनत घेतली. अपंगत्वाचा बाउ करणे त्याला आवडत नाही.
त्यामुळे त्याने परीक्षेदरम्यान लेखनिकही (रायटर) घेतला नाही. १२ वीचे पेपर त्याने स्वत:च सोडविले. आणि नियतीलाही त्याच्या जिद्दीपुढे झुकावे लागले. त्याला परीक्षेत ८९.६९ टक्के गुण मिळाले आहे. प्रेषितला अभियंता व्हायचे असून जेईईईची परीक्षा यशस्वी होण्याचा विश्वास त्याला आहे.
प्रेषितच्या वडिलांनी मुलाच्या यशामुळे अभिमान वाटत असल्याचे सांगितले. प्रेषित त्यांच्या एकुलता एक मुलगा आणि त्याची ज्या क्षेत्रात जायची इच्छा असेल त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Disability could not prevent him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.