शिक्षण विभागाचा सर्व्हर डाऊन

By admin | Published: August 29, 2015 03:25 AM2015-08-29T03:25:22+5:302015-08-29T03:25:22+5:30

शिक्षण विभागाने सर्व कामकाज आॅनलाईन करण्याचा घाट घातला आहे. आॅनलाईन कामाचा लोड वाढल्याने शिक्षण विभागाचे सर्व्हर डाऊन होत आहे.

Education Department's server down | शिक्षण विभागाचा सर्व्हर डाऊन

शिक्षण विभागाचा सर्व्हर डाऊन

Next

आॅनलाईन कामकाजाला फटका : सरल होणार महिन्याभरात रेग्युलर
नागपूर : शिक्षण विभागाने सर्व कामकाज आॅनलाईन करण्याचा घाट घातला आहे. आॅनलाईन कामाचा लोड वाढल्याने शिक्षण विभागाचे सर्व्हर डाऊन होत आहे. संचमान्यता असो की सरलच्या कामाला सर्व्हरमुळे फटका बसत आहे. अतिरिक्त सर्व्हरसाठी ‘एनआयसी’ सोबत बैठक झाली असून, ४० अतिरिक्त सर्व्हर शिक्षण विभागाला मिळणार आहे. त्यामुळे सरलचे काम महिन्याभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली.
शासनाने राबविलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र याचा आढवा घेण्यासाठी शुक्रवारी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. राज्यभरातील विद्यार्थ्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी सरल ही डाटाबेस यंत्रणा शालेय शिक्षण विभागाने राबविली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्डची सक्ती केली आहे. आधारकार्डसाठी विद्यार्थ्यांची लूट सुरू असल्यामुळे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून, शाळेतच आधारकेंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सरलचे काम विभागनिहाय वाटून देण्यात आले आहे. नागपूर विभागात ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान सरलची नोंदणी करायची आहे.
अद्याप राज्यभरात सरलमध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. दरवर्षी आरटीई संदर्भात होत असलेला घोळ पुढच्या वर्षापासून होणार नाही, यासाठी सर्वसमावेशक धोरण राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. १७२ वर्ग २ च्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. ही लवकरात लवकर भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, विभागीय उपायुक्त कमलकिशोर फुटाणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Education Department's server down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.