नागपुरात फेब्रुवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:15 AM2018-08-24T11:15:55+5:302018-08-24T11:16:18+5:30
खापरी ते मुंजे चौक आणि हिंगणा ते मुंजे चौक मेट्रो स्टेशनपर्यंत २२ कि़मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण फेब्रुवारी-२०१९ पर्यंत करण्याचे लक्ष्य असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खापरी ते मुंजे चौक आणि हिंगणा ते मुंजे चौक मेट्रो स्टेशनपर्यंत २२ कि़मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण फेब्रुवारी-२०१९ पर्यंत करण्याचे लक्ष्य असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी म्हटले आहे.
प्रकल्पाचे नियोजन आणि वेळापत्रकानुसार नागपूर मेट्रो रेल्वेचे लोकार्पण डिसेंबर-२०१९ पर्यंत होणार आहे, हे विशेष. महामेट्रोच्या प्रकल्पाचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे. नागपूर मेट्रो रेल्वेचे काम करीत असतानाच शहरातील अन्य नवीन विकास कामांची जबाबदारी महामेट्रोवर सोपविण्यात आली आहे. मुख्य रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पूल पाडण्याचे कार्य आणि आॅरेंज सिटी स्ट्रीट निर्मिती महामेट्रो करणार आहे.