माजी खासदार प्रकाश जाधव शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:21 AM2018-01-16T00:21:53+5:302018-01-16T00:23:41+5:30
माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. सोमवारी मुंबई येथे ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी तक्रार केली होती. त्यानंतर तातडीने ही नियुक्ती करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. सोमवारी मुंबई येथे ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी तक्रार केली होती. त्यानंतर तातडीने ही नियुक्ती करण्यात आली.
सतीश हरडे यांच्याविरोधात पक्षात खदखद होती. हरडेंना जिल्हा प्रमुख पदावरून हटविण्यासाठी शिवसैनिकांची बैठक झाली होती. सतीश हरडे यांनी नवीन कार्यकारिणी गठित करताना कुणालाही विचारात घेतले नाही. खऱ्या अर्थाने काम करणाºया कार्यकर्त्यांना डावलले असा आरोप शिवसैनिकांनी केला होता. हरडे यांनी मनपाच्या निवडणुकांतदेखील शिवसेनेला यश मिळावे यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत व पक्ष मजबूत करण्यावर कुठलाही जोर दिला नाही अशी तक्रार ज्येष्ठ शिवसैनिकांनी पक्षदरबारी केली.
यानंतर सोमवारी प्रकाश जाधव यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकाश जाधव हे याअगोदर दोनदा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहून चुकले आहे. तसेच नागपूरचे संपर्कप्रमुखदेखील होते.