नागपूरनजीकच्या कुवांरा भिवसेनमध्ये व्हावी भव्य फिल्म सिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:44 PM2018-02-01T23:44:27+5:302018-02-01T23:49:39+5:30
शहरात कलावंतांची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर देशभरात नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी शहराजवळील कुंवारा भिवसेन येथे भव्य फिल्म सिटी निर्माण व्हावी, असे मला वाटते. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजकांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हवी ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कलावंतांची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर देशभरात नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी शहराजवळील कुंवारा भिवसेन येथे भव्य फिल्म सिटी निर्माण व्हावी, असे मला वाटते. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजकांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हवी ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर मनपा, आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, विदर्भ साहित्य संघ, सप्तक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच पुणे फिल्म फाऊंडेशनतर्फे गुरुवारी कवी कुलगुरू कालिदास आॅडिटोरियममध्ये आयोजित दुसºया आॅरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, माजी आमदार आशिष जयस्वाल, मनपा उपायुक्त रवींद्र देवतळे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांना ‘आॅरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड’ तर प्रसिद्ध संगीतकार रामलक्ष्मण यांना ‘आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे सुपरांत सेन, फिल्म गुरु समर नखाते, अमर पाटील, विशाल शिंदे, समीर बेंद्रे, डॉ. रत्नम जे नायर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे म्हणाले, मनोरंजनाशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. शारीरिक सुदृतेसाठी मनोरंजन आवश्यक आहे. चित्रपट हे त्यासाठीचे सशक्त माध्यम आहे. डॉ. जब्बार पटेल यांनी आपल्या भाषणात या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. उद्घाटनानंतर पोस्को स्पूर हा पोलंडचा चित्रपट दाखविण्यात आला.