पंडित नेहरू यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:31 AM2017-11-15T00:31:15+5:302017-11-15T00:31:34+5:30
देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नासुप्र
नासुप्र कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाव्यवस्थापक अजय रामटेके, अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार, नगर रचना सहायक संचालिका सुनीता अलोणी, आस्थापना अधिकारी नीलिमा पाटणे यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी अभिवादन केले.
नागपूर महापालिका
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रभागाचे नगरसेवक महेश महाजन यांनी मिरची बाजार मस्कासाथ येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सतीश महाजन, अरुण अवचट, दिनकरराव बावनकर, अर्जुन जाधव, राजेश मुकरदम, देवाजी हरडे, लालाजी गुप्ता, सुधीर मानकर, विनोद जैन व रमेश मौंदेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवती काँग्रेस
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतिने शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या गणेशपेठ येथील कार्यालयात बालक दिवस साजरा करण्यात आला. कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली व नूतन रेवतकर,शेलेंद्र तिवारी,जतीन मलकान यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात लहान मुलाना वहया पुस्कतके व बिस्किटचे पॅकेट वाटप करण्यात आले. शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष अध्यक्ष पूनम रेवतकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात श्वेता मालिक,निकिता भोयर, बबिता मांडवकर,ईशा रानडे, खुशी डोनारकर,खुशी दिवे,वैशाली भोयर, उषा सारवे,प्राजक्ता सारवे,रुद्र धाकडे, रवि पराते, सदाशिव बावने,मोंटू बेंडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी केले विनम्र अभिवादन
भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.