वाढत्या लोकसंख्येचा विचार
By admin | Published: March 18, 2015 02:36 AM2015-03-18T02:36:20+5:302015-03-18T02:36:20+5:30
वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणाचा विचार करून विकास आराखड्यात विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
नागपूर : वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणाचा विचार करून विकास आराखड्यात विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत क्लीन सिटी ग्रीन सिटी निर्माण करणे, मलनिस्सारण, २४ तास पाणीपुरवठा, दूषित पाण्यावर प्रक्रिया, रस्ते, गरीब लोकांसाठी घरे उभारणे, घनकचरा व्यवस्थापन, सक्षम वाहतूक यंत्रणा, सांस्कृतिक-शैक्षणिक सुविधांसोबतच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले. कार्यशाळेच्या माध्यमातून नगरसेवक व नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीच्या आराखड्यात काही त्रुटी होत्या, त्या दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती शशिकांत हस्तक यांनी प्रास्ताविकातून दिली. दयाशंकर तिवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेला नगरसेवक , विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
उपस्थितांनी सूचना मांडल्या
कार्यशाळेत नगरसेवक व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या. यात राजू नागुलवार, मुरली मेश्राम, मनीषा घोडेस्वार, कांता रारोकर, संजय गोगुलवार, उज्ज्वला चक्रदेव, हेमंत माने, वीणा खानोरकर, सुब्बाराव, जे.पी.शर्मा आदींचा समावेश होता. तसेच आराखड्यावर आॅनलाईन वा लिखित स्वरुपात सूचना स्वीकारल्या जात असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.