इंडिगोची नागपूर-मुंबई-नागपूर नवीन फ्लाईट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:13 AM2019-04-16T01:13:43+5:302019-04-16T01:14:39+5:30
इंडिगो एअरलाईन्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी मुंबईसाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. फ्लाईट क्रमांक ६ ई ५३८९ हे दुपारी ३.३० वाजता नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यात मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाईन्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी मुंबईसाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. फ्लाईट क्रमांक ६ ई ५३८९ हे दुपारी ३.३० वाजता नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यात मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला.
जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने इंडिगोने आता प्रॉफिटवाल्या रुटवर नवीन वेळेत फ्लाईट सुरू केली आहे. या विमानाची प्रवासी क्षमता १८० आहे. हे विमान मुंबईहून नागपुरात सकाळी ११ वाजता उड्डाण करेल. विशेष म्हणजे जेट एअरलाईन्सची किमान दोन महिन्यापूर्वी मुंबई व दिल्लीची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यानंतर अन्य एअरलाईन्स जेटचा टाइम स्लॉट मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. सध्या इंडिगोच्या नवीन फ्लाईटला दुपारचा वेळ मिळाला आहे. मात्र त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण जेटचे विमान बंद झाल्याने प्रवाशांची संख्या लक्षात घेता, विमानांची आवश्यकता वाढली आहे.
प्रवासी किरायात मनमानी!
एअरलाईन्सच्या कमतरतेमुळे काही एअरलाईन्स फायदा घेत असून, तत्काळ तिकिटांवर जास्तीची वसुली केली जात आहे. सूत्रांच्या मते, मुंबई व दिल्लीचा किराया १० ते १२ हजार रुपयांपर्यंत वसूल केला जात आहे. स्पर्धक कंपन्या नसल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसतो आहे.