जरा हटके! ... जेव्हा मुख्यमंत्री देतात प्लास्टिक न वापरण्याबाबत समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:17 PM2018-10-21T14:17:53+5:302018-10-21T14:23:58+5:30
खुद्द मुख्यमंत्री आपल्या स्टॉलसमोर थांबलेले आहेत आणि वस्तू न्याहाळत आहेत हे पाहून आधीच थक्क झालेला विक्रेता बाटलीचे प्लास्टिक हाती घेतो. आणि मग मुख्यमंत्री त्याला राज्यात असलेल्या प्लास्टिक बंदीबाबत आणि त्याने होणाऱ्या नुकसानाबाबत समज देतात..
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पूर्वनियोजनानुसार कार्यक्रमाचे उत्साहात उदघाटन होते.... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फीत कापतात आणि प्रदर्शनात फिरू लागतात... फिरताना तांब्याच्या वस्तू असलेल्या एका स्टॉलजवळ थांबतात.. तेथील तांब्याच्या पाण्याच्या बाटलीला हातात घेऊन त्यावरचे प्लास्टिकचे आवरण काढतात आणि स्टॉल विक्रेत्याच्या हाती देतात.. खुद्द मुख्यमंत्री आपल्या स्टॉलसमोर थांबलेले आहेत आणि वस्तू न्याहाळत आहेत हे पाहून आधीच थक्क झालेला विक्रेता बाटलीचे प्लास्टिक हाती घेतो. आणि मग मुख्यमंत्री त्याला राज्यात असलेल्या प्लास्टिक बंदीबाबत आणि त्याने होणाऱ्या नुकसानाबाबत समज देतात.. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या समजेने पुरता गारद झालेला तो विक्रेता पुन्हा प्लास्टिक वापरणार नाही याची त्यांना ग्वाही देतो.. मुख्यमंत्री स्मित करत पुढे सरकतात आणि आयोजकांसह अनेकांचा अडकलेला श्वास मोकळा होतो...
हा प्रसंग आहे, रविवारी सकाळी नागपुरात मुख्यमंत्र् यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात आयोजित महालक्ष्मी सरस या प्रदर्शनातला. मग सगळ््यांमध्ये हीच चर्चा अधिक चवीने चर्चिली जाऊ लागते..