नागपुरात आॅटोरिक्षा, बस, मेट्रोत चालणार एक महाकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:25 PM2018-01-24T22:25:31+5:302018-01-24T22:36:13+5:30

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य वेगात सुरू असून, शेवटच्या माणसापर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर मेट्रो ईएमव्ही (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप आॅटोमेटिक फेअर कलेक्शन सिस्टम वापरण्यात येणार आहे. ती मेट्रो स्टेशनमध्ये लागू केली जाईल.

A MAHA Card will operate in autorickshaw, bus and metro | नागपुरात आॅटोरिक्षा, बस, मेट्रोत चालणार एक महाकार्ड

नागपुरात आॅटोरिक्षा, बस, मेट्रोत चालणार एक महाकार्ड

googlenewsNext
ठळक मुद्दे‘महाकार्ड’चे प्रवासीचलन लवकरचमेट्रो बुटीबोरीपर्यंत धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य वेगात सुरू असून, शेवटच्या माणसापर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर मेट्रो ईएमव्ही (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप आॅटोमेटिक फेअर कलेक्शन सिस्टम वापरण्यात येणार आहे. ती मेट्रो स्टेशनमध्ये लागू केली जाईल.
आधुनिक पद्धतीचे ईएमव्ही कार्ड डिझाईन केले आहे. इतर मेट्रो रेल्वेसाठी देशभरात लूप कार्ड वापरण्यात येते, मात्र नागपूरकरांना आॅटोरिक्षा, बस आणि मेट्रोमध्ये फक्त एका स्मार्टकार्डवर प्रवास करता येईल. महामेट्रोच्या व्यावसायिक नियमांच्या आधारावर प्रवाशांना कार्डचा उपयोग करता येणार आहे. ईएमव्ही स्मार्ट कार्डचा व्यवहार पारदर्शक असल्याने तिकीट खरेदीत गैरसोय होणार नाही. क्यूआर कोड तिकीट आणि मोबाईल तिकीट सिस्टमच्या माध्यमातून प्रवाशांना फेअर मीडिया पर्यीयानुसार अतिरिक्त लवचिकता प्रदान केली जाईल. तसेच व्हीलचेअर वापरणाऱ्या दिव्यांग आणि रुग्णांसाठी स्थानकावर प्रवेश व बाहेर जाण्याची विस्तीर्ण व्यवस्था असेल. मेट्रो नागपूर मार्गावर लवकरच धावणार असल्याने मेट्रोने इतर सुविधेवर भर देण्यास सुरुवात केली आहे.
नागपूर मेट्रो बुटीबोरीपर्यंत धावणार
नागपूर मेट्रोच्या प्रवासी वाहतुकीला लवकरच सुरुवात होणार आहे. नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरीपर्यंत धावणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या विकासावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव मिलिंद कानडे आणि पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयात चर्चा केली. त्यांनी मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधकाम करण्याच्या मुद्यांवर विचार करण्याची तयारी दर्शविली. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र विदर्भातील प्रमुख क्षेत्र आहे. मेट्रोची प्रवासी वाहतूक सेवा बुटीबोरीपर्यंत सुरू राहावी, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दीक्षित यांनी सांगितले की, मेट्रो विस्तारासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार केला जात आहे. सरकारी मालकीच्या रेल इंडिया टेक्निकल सर्व्हिसेस (आरआयटीईईएस) रॅडशस आणि वाहतूक सर्वेक्षण डाटाच्या आधारावर निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: A MAHA Card will operate in autorickshaw, bus and metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.