Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:26 AM2019-10-22T00:26:20+5:302019-10-22T00:28:10+5:30

मतदार केंद्रापर्यंत जाण्यास जोपर्यंत चांगला रस्ता बनविला जाणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेत गोधनीवासीयांनी आज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला.

Maharashtra Assembly Election 2019: Godhani residents boycott voting for roads | Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार 

Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मतदार केंद्रापर्यंत जाण्यास जोपर्यंत चांगला रस्ता बनविला जाणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेत गोधनीवासीयांनी आज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला.


गोधनीतील होले ले-आऊट, कलेक्टर कॉलनी, पद्मावतीनगर, दिव्यनगरी, सरोदे ले-आऊट आदी भागातील रस्त्यांचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. मुख्य रत्यावरही हजारो खड्डे असल्याने मतदारांना खड्डे पार करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. दरम्यान, गोधनी रेल्वे येथील होले ले-आऊटमधील ३५ ते ४० कुटुंबातील सुमारे ३०० मतदारांनी आज मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला. नागरिकांनी निवडणुकीपूर्वी रस्त्यांसाठी आंदोलन करीत मतदान करणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, आंदोलन आणि लेखी निवेदनाचीही दखल न घेतल्याने आज नागरिकांनी मतदानांवर सामूहिक बहिष्कार टाकल्याचे परिसरातील भारत पाटणकर यांनी सांगितले. वस्तीतील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच परिसरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आम्ही वेळेवर कर भरत असतो, मात्र मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. प्रशासनाला आमच्या जीवनाशी खेळण्याचा कुठलाही अधिकार नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून नागरिकांच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकल्याचे गोधनीवासी हरीराम डोंगरे, जयंतीबाई ओमकार, गीता भुवाडे, प्रवीण राऊत, कचराबाई चौधरी, मंगुनबाई चौधरी आदींनी सांगितले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Godhani residents boycott voting for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.