मानेवाडा रोडचा श्वास कोंडतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:42 AM2017-10-29T01:42:40+5:302017-10-29T01:42:55+5:30
मानेवाडा रोडवरील अशोका फर्निचरच्या मालकाने अतिक्रमण केले आहे. फूटपाथवर फर्निचर ठेवले आहे. सोबतच बांधकाम साहित्य फूटपाथवरच ठेवले आहे.
मानेवाडा रोडवरील अशोका फर्निचरच्या मालकाने अतिक्रमण केले आहे. फूटपाथवर फर्निचर ठेवले आहे. सोबतच बांधकाम साहित्य फूटपाथवरच ठेवले आहे. फूटपाथवर कब्जा केला आहे. कापड विक्रे त्यांनीही फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. जुन्या गाड्या विक्रे त्यांनीही फूटपाथवर ठेवल्या आहेत.
रुग्णालयांचे पार्किंग रोडवर
तुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर अनेक लहान मोठी रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयात पार्किगसाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही. फूटपाथवर वा रोडवर वाहने ठेवली जातात. यामुळे सायंकाळच्या सुमारास या मार्गावर रहदारीला अडथळा निर्माण होतो.
बॅकांचे पार्किंग फूटपाथवरच
तुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत. बँकात सतत लोकांची गर्दी असते. मात्र बँक व्यवस्थापनाने पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. यामुळे लोकांना फूटपाथ वा रोडवर वाहने पार्क करावी लागतात. अधूनमधून वाहतूक पोलीस वाहने उचलतात. पण पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने बँकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
मॉलचेही अतिक्रमण
मानेवाडा रोडवर रक्षक बंधू यांचा मॉल आहे. मॉलच्या समोरील फूटपाथवर अतिक्रमण आहे. खरेदीसाठी ग्राहक ांची गर्दी असूनही पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने फूटपाथवर उभी केली जातात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. परंतु महापालिकेच्या पथकाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.
रेणुका कॉर्नरला फूटपाथवर वाहने
मानेडवाडा रोडवरील रेणुका कॉर्नर हॉटेलच्या समोरील फूटपाथवर अतिक्रमण आहे. फूटपाथच्या पुढे रोडवर वाहने उभी केली जातात. सायंकाळी ग्राहकांच्या गर्दीमुळे रहदारीला अडथळा होतो.
फूटपाथवर फटाक्यांची दुकाने
दिवाळीपूर्वी फूटपाथवर दुकाने लावण्यात आली होती. काही दुकाने अजूनही सुरू आहेत. अतिक्रमण करून लावण्यात आलेल्या विक्रे त्यांकडून शुल्क वसूल करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहे. निर्देश असतानाही शुल्क वसूल केले जात नाही.
बीअरबारपुढे फूटपाथवर वाहने
मानेवाडा मार्गालगत बीअरबार आहेत. रात्रीला बारमध्ये येणाºयांची गर्दी असते. परंतु पार्किंग स्वतंत्र व्यवस्था नसल्याने रोडवर वाहने पार्किग केली जातात. या रोडवर दारू विक्रीचीही दुकाने आहेत. ग्राहक रोडवर गाडी उभी करून दुकानात जातात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.