नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ट्रक- अँबुलन्समध्ये जोरदार धडक ; चार ठार; पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:27 AM2017-12-04T11:27:21+5:302017-12-04T11:28:05+5:30
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील आठवा मैल आठवडी बाजार पॉवर स्टेशन परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळवरून दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले आहेत.
नागपूर: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील आठवा मैल आठवडी बाजार पॉवर स्टेशन परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळवरून दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अॅम्ब्युलन्स क्र. एम एच ४१ ४७४२ या वाहनाने अकोला जिल्ह्यातील आगर येथील भालेराव परिवार व त्यांचे नातेवाईक मुलाच्या उपचाराकरिता नागपूरला येत असताना नागपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने विरुद्ध दिशेने येऊन धडक दिल्याने अॅम्ब्युलन्सचा वाहक प्रमोद दिगंबर बंड (३५), विमल रामेश्वर भालेराव (३०), श्रीराम महादेव धारपगार (३४) हे जागीच ठार झाले तर आकाश रामेश्वर भालेराव ()१२ याला मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. अंबादास राजाराम दावणे (३५), ईश्वर मोहन मुदगल (२५), लक्ष्मी किसन बावणे (३५), किसन अंबादास बावणे (४५) व रामेश्वर जानराव भालेराव (३४) रा. सर्व आगर, अकोला हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले आहे. अॅम्ब्युलन्सचा चालक गजानंद सरदार कौलखेडा हा तसेच ट्रक ड्रायव्हर ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस तपास सुरू आहे.