अकोल्याच्या मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या कलाविष्काराने नागपूरकर मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:56 PM2018-01-12T12:56:03+5:302018-01-12T13:00:44+5:30

नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सृजनअंतर्गत सिव्हील लाईन्समधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत अकोल्याच्या मधुमिता वऱ्हाडपांडे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु झाले आहे.

Nagpurians mesmerize by the artwork of Madhumati Varhadpande of Akola | अकोल्याच्या मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या कलाविष्काराने नागपूरकर मंत्रमुग्ध

अकोल्याच्या मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या कलाविष्काराने नागपूरकर मंत्रमुग्ध

Next
ठळक मुद्देचित्रकलेचे कुठलेही ज्ञान नसताना साकारली शेकडो चित्रेरंगकामाच्या उर्मीने सोडली नोकरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सृजनअंतर्गत सिव्हील लाईन्समधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत अकोल्याच्या मधुमिता वऱ्हाडपांडे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु झाले आहे. मुक्त अमूर्त (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) आणि निसर्गदृष्य (लँडस्केप) या दोन विषयांची निवडक चित्रे त्यांनी या त्यांच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनात समाविष्ट केली आहेत. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे वरिष्ठ लेखा व प्रशासन अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाट्न गुरुवारी करण्यात आले.
चित्रकलेचा आपल्याला कुठलाही गंध नव्हता. शालेय जीवनात जी चित्रे काढली व ज्या प्राथमिक स्वरुपाच्या परीक्षा दिल्या तेवढाच काय तो चित्रकलेचा संबंध असल्याचे मधुमती सांगतात. मात्र दोन वर्षांपूर्वी मनातील एकाएकी दाटून आलेल्या अस्वस्थतेला वाट करून देण्यासाठी त्यांनी चित्रे काढणे सुरु केले. पुढे तहानभूक विसरून त्या चित्रे काढीत राहिल्या. यात प्रामुख्याने मुक्त अमूर्त चित्रांचा अधिक समावेश होता. या चित्रांमधून त्यांच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाल्यानंतर त्यांनी निसर्ग दृष्यांचीही चित्रे साकरण्यास सुरुवात केली. पुढे चित्रांची आवड इतकी तीव्र झाली की त्यांनी आपली खाजगी नोकरी सोडून पूर्णवेळ चित्रे काढण्यात स्वत:ला झोकून दिले.
काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरावावे या त्यांच्या ज्येष्ठ मुलाने केलेल्या सूचनेचा स्वीकार करून त्यांनी हे प्रदर्शन प्रथम नागपुरात भरवले आहे.
कलेचा अविष्कार हा वयाच्या कुठल्याही टप्प्यात व्यक्तीला जाणवू शकतो, त्याने आपल्यातील त्या सुप्त शक्तींना बाहेर येण्याची संधी व वेळ दिला पाहिजे असे मत मधुमती वऱ्हाडपांडे व्यक्त करतात. हे प्रदर्शन येत्या १६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Web Title: Nagpurians mesmerize by the artwork of Madhumati Varhadpande of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.