बनावट प्रमाणपत्रे तयार करणारे रॅकेट उघड

By admin | Published: June 26, 2016 02:46 AM2016-06-26T02:46:24+5:302016-06-26T02:46:24+5:30

विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तयार करून ती नागरिकांना विकणाऱ्या रॅकेटचा महसूल विभागाच्या पथकाने छडा लावला.

Open the racket to create fake certificates | बनावट प्रमाणपत्रे तयार करणारे रॅकेट उघड

बनावट प्रमाणपत्रे तयार करणारे रॅकेट उघड

Next

आरोपी फरार: बनावट शिक्के जप्त
नागपूर : विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तयार करून ती नागरिकांना विकणाऱ्या रॅकेटचा महसूल विभागाच्या पथकाने छडा लावला. या रॅकेटचा सदस्य असलेल्या एकाच्या घरी शुक्रवारी रात्री छापा घालण्यात आला. यावेळी या पथकाला मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि विविध अधिकाऱ्यांची शिक्के आढळले. आरोपी मात्र पळून गेला. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुटमळणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहे.
शाळा-महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांची विविध प्रमाणपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी असते. या गर्दीत शिरून झटपट प्रमाणपत्र मिळवून देण्याचे दलाल आमिष दाखवतात. त्या बदल्यात संबंधित पालकांकडून मोठी रक्कम उकळून त्यांच्या हातात बनावट प्रमाणपत्र ठेवले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. फसवल्या गेलेल्या पालकांकडून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारीचा ओघ वाढल्याने महसूल विभागामार्फत त्याची गोपनीय चौकशी करण्यात आली. वैशालीनगर, पाचपावलीतील आरोपी अतुल बबन तलमले हा बनावट प्रमाणपत्रे तयार करून विकत असल्याची माहिती कळताच तहसीलदार गजेंद्र रामकृष्ण बालपांडे यांनी सहकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी त्याच्या घरी छापा घातला.

Web Title: Open the racket to create fake certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.