लोकमत समूह व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे आयोजन : चित्रकला प्रदर्शन आजपासून
By admin | Published: June 12, 2016 02:39 AM2016-06-12T02:39:35+5:302016-06-12T02:39:35+5:30
लोकमत वृत्तपत्र समूह व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक पर्यावरण दिन चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार जाहीर
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ५०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा तीन वयोगटात झाली. त्यानुसार ५ ते १० वर्षे वयोगट, ११ ते २० आणि २० वर्षांपेक्षा अधिक अशा तीन गटात विभाजन करण्यात आले होते. वाढते औद्योगिकीकरण व प्रदूषणामुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे व जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील स्पर्धकांनी आपली अभिव्यक्ती चित्रांच्या माध्यमातून कागदावर साकारली. ही स्पर्धा सर्वांसाठी नि:शुल्क होती. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी कागद उपलब्ध करून देण्यात आले होते. स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी दोन तासाचा वेळ दिला होता. या स्पर्धेनंतर प्रो. सदानंद चौधरी यांच्या उपस्थितीत विजेत्यांची निवड करण्यात आली.(प्रतिनिधी)