गड्डीगोदाम रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:24 AM2017-10-30T00:24:55+5:302017-10-30T00:25:31+5:30

कामठी रोडवर गुरुद्वाराजवळ गड्डीगोदाम रेल्वे पुलाला भेग (क्रॅक) पडल्याची बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे.

The repair work of Gaddigondam Railway Bridge at the battlefield | गड्डीगोदाम रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

गड्डीगोदाम रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

Next
ठळक मुद्देसंथगती चालल्या गाड्या : कामठी रोडची वाहतूक बंद, वाहनचालकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवर गुरुद्वाराजवळ गड्डीगोदाम रेल्वे पुलाला भेग (क्रॅक) पडल्याची बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे. दुरुस्तीचे काम दुसºया दिवशीही सुरू होते. त्यामुळे डाऊन लाईनवर चालणाºया गाड्यांना कॉशन आॅर्डर म्हणजे संथगतीने चालविण्यात आले. मात्र पुलाखालून कामठी रोडची वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे प्रबंधक ब्रिजेशकुमार गुप्ता यांच्या निरीक्षणाखाली वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) यांच्या नेतृत्वात अभियांत्रिकी विभागाचे १५० कर्मचारी व कामगार सकाळपासून दुरुस्तीच्या कामात लागले होते. पुलाच्या भेग पडलेल्या भागासह रेल्वे रुळाला स्लीपरशी जोडणाºया लोखंडाच्या चावीलाही वेल्डिंग करण्यात आले. तुटलेल्या काँक्रिट स्ट्रक्चरची डागडुजी करण्यात आली. मनमाड येथून तयार करून आणलेले लोखंडाचे माठे गर्डर गड्डीगोदाम पुलाच्या परिसरात ठेवण्यात आले. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुलाला लोखंडाच्या स्ट्रक्चरद्वारा सपोर्ट देण्यात आला आहे.
या सर्व कामादरम्यान पुलावरून जाणाºया अप आणि डाऊन लाईनच्या गाड्यांना कॉशन आॅर्डरवर चालविण्यात आले. याअंतर्गत गाड्यांचा वेग २५ किमी/तास यापेक्षा अधिक नसतो. यामध्ये लोखंड लादून असलेली मालगाडी नागपूरहून कळमेश्वरला आणि व्हेईकल आॅईल असलेली मालगाडी याच पुलावरून बुटीबोरीला रवाना करण्यात आली. पहिल्या दिवशी सहापेक्षा जास्त गाड्यांना डाऊन लाईनवरूनच चालविणे शक्य झाले होते.
डीआरएम ब्रिजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, गड्डीगोदाम पुलाचा क्षतिग्रस्त भाग लोखंडाच्या गर्डरने जोडण्यात येईल. मनमाडहून हे गर्डर आणून या परिसरात ठेवण्यात आले आहेत. एका ट्रॅकसाठी दोन गर्डरची आवश्यकता होती. हे गर्डर पुलावर चढवून जोडण्यात येतील. दुरुस्तीच्या कामादरम्यान अप आणि डाऊन लाईनची वाहतूक सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनतेने सहकार्य करावे : डीआरएम
मंडळ रेल्वे प्रबंधक ब्रिजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले, गड्डीगोदाम रेल्वे पुलाच्या दुरुस्ती कामामुळे कामठी रोडची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गावरील वाहनचालकांना त्रास होत असल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. रेल्वे प्रवासी आणि पुलाखालच्या मार्गाने जाणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या दुरुस्तीचे काम आवश्यक होते. दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असून, जनतेकडून सहकार्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: The repair work of Gaddigondam Railway Bridge at the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.