सेल्समन म्हणून आले दागिने चोरून नेले

By admin | Published: February 26, 2015 02:16 AM2015-02-26T02:16:26+5:302015-02-26T02:16:26+5:30

सेल्समन म्हणून घरात प्रवेश केला. घरातील विद्यार्थिनीला एकटे बघून तिच्यावर वार करून बेशुद्ध केले आणि दोन लाख रुपयांचे दागिने लुटून नेले.

As a salesman, the jewelry was stolen | सेल्समन म्हणून आले दागिने चोरून नेले

सेल्समन म्हणून आले दागिने चोरून नेले

Next

नागपूर : सेल्समन म्हणून घरात प्रवेश केला. घरातील विद्यार्थिनीला एकटे बघून तिच्यावर वार करून बेशुद्ध केले आणि दोन लाख रुपयांचे दागिने लुटून नेले. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना दीनदयाल नगरात घडली. जखमी विद्यार्थिनीचे नाव धनश्री हेमंत सहारे आहे. दीनदयाल नगरात डॉ. आर. एस. पितळे यांच्या घरी हेमंत सहारे हे किरायाने राहतात. बुधवारी सकाळी ते आपल्या कार्यालयात निघून गेले. त्यांची पत्नी जि.प. हिंगणा शाळेत शिक्षिका आहेत, त्याही शाळेत निघून गेल्या. धनश्री घरी एकटी होती. आईवडील गेल्यानंतर मोबाईल रिचार्ज करण्यासाठी घराबाहेर पडली. धनश्रीला घराबाहेर पडल्यानंतर आणि परत येतानाही दोन युवक रस्त्यावर उभे दिसले. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती घरात गेली.
ती घरात पोहचल्यानंतर काही मिनिटातच त्या दोन युवकांनी घराचा दरवाजा ठोठावला. दोघांनी चेहऱ्यावर कपडा बांधला होता. त्यांनी शाम्पू विक्री करीत असल्याचे सांगितले. मात्र धनश्रीने शाम्पू खरेदी करण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी पाण्याची मागणी गेली. धनश्रीने दरवाजा खोलताच युवकांनी तिच्या डोक्यावर भारी वस्तूने वार केला. धनश्री बेशुद्ध होऊन पडली. ती शुद्धीवर आल्यानंतर बेडरूमच्या आलमारातील सामानाची फेकफाक करण्यात आली होती. आलमारीत दागिने नव्हते. तिने लगेच आपल्या आईवडिलांना सूचना दिली.
त्यानंतर हेमंत सहारे यांनी घरी पोहचून पोलिसांना सूचना केली. गुन्हे शाखेच्या डीसीपी दीपाली मासिरकर यांच्यासह अधिकारी घटनास्थळी पोहचले. दीनदयाल नगर रहिवासी परिसर आहे. सहारे यांच्या घरापुढे कॉन्व्हेंट आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. आरोपींच्या चोरीच्या पद्धतीवरून, त्यांना सहारे कुटुंबीयांच्या घडामोडींची माहिती असल्याचे दिसून येते. यापूर्वीही प्रतापनगर हद्दीत सेल्समन सांगून लुटपाट करण्याच्या घटना घडल्या आहे. या घटना लक्षात घेता पोलीस अशा प्रकरणात संशयित असलेल्या आरोपीचा शोध घेत आहे. धनश्री बारावीत असल्याने सध्या तिची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे पोलीस संयम बाळगून आहे. मात्र या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: As a salesman, the jewelry was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.