अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, साेशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 12:49 PM2022-06-10T12:49:38+5:302022-06-10T12:58:08+5:30
त्याने बदनामी करण्याची धमकी देत दाेनदा त्याच्या घरी बाेलावून तिच्यावर अतिप्रसंगही केला.
सावनेर (नागपूर) : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्याचा देखावा करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सावनेर शहरात नुकतीच घडली. या प्रकरणातील आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याने साेशल मीडियाच्या माध्यमातून तिची बदनामी केल्याचेही उघड झाले आहे.
राजा स. फुले (२३, रा. वाॅर्ड क्रमांक ४, श्री साईनगर, गुजरखेडी, सावनेर), असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याची १७ वर्षीय मुलीशी ओळख झाली होती, त्याने तिच्याशी सप्टेंबर २०१९ मध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० राेजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिला स्वत:च्या घरी बाेलावून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याने जबरदस्तीने तिच्या गळ्यात हार टाकून साेबत फाेटाेही काढले.
पुढे त्याने बदनामी करण्याची धमकी देत दाेनदा त्याच्या घरी बाेलावून तिच्यावर अतिप्रसंगही केला. त्यानंतर त्याने साेमवारी (दि.६) तिचे गळ्यात हार टाकलेले फाेटाे व अश्लील मॅसेज साेशल मीडियावर पाेस्ट व व्हायरल करून तिची बदनामी केली. शिवाय, तिच्या वडिलांना अश्लील शिवीगाळ केली. परिणामी, तिने पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी विविध कलमांसह, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ४, ५ (एल), बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ३ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक गेडाम करीत आहेत.