नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 06:02 PM2018-08-21T18:02:54+5:302018-08-21T18:03:58+5:30

बनावट कागदपत्राच्या आधारे एका त्रिकुटाने बँकेला २१ लाख रुपयांचा गंडा घातला. कमलेश राजकुमार तिवारी (वय ४३), करण राजकुमार तिवारी (वय ३८, दोघेही रा. प्रेरणानगर) आणि प्रदीप बाजीराव काळे (वय ३४, रा. हनुमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत.

By taking loans on fake documents dupe the bank 21 lakhs in Nagpur | नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा

नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देत्रिकुटाविरुद्ध नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे एका त्रिकुटाने बँकेला २१ लाख रुपयांचा गंडा घातला. कमलेश राजकुमार तिवारी (वय ४३), करण राजकुमार तिवारी (वय ३८, दोघेही रा. प्रेरणानगर) आणि प्रदीप बाजीराव काळे (वय ३४, रा. हनुमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी १ फेब्रुवारी २०१२ ते १ मार्च २०१३ या कालावधीत खसरा क्रमांक ६१/ १६३ मधील १४ क्रमांकाचा भूखंड आणि त्यावर करण्यात आलेल्या बांधकामाचे बनावट विक्रीपत्र तयार केले. हे विक्रीपत्र बँक आॅफ इंडियाच्या दिघोरी शाखेत गहाण ठेवले आणि बँकेतून २१ लाखांचे कर्ज उचलले. या रकमेची आपसात वाटणी करून आरोपींनी कर्जाच्या रकमेची परतफेड न करता बँकेची फसवणूक केली. पाच वर्षांनंतर ही बनवाबनवी उघडकीस आली. त्यामुळे बँकेतर्फे राजेश गंगाधर सोनकुसरे (वय ५३, रा. मनीषनगर) यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून सोमवारी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

Web Title: By taking loans on fake documents dupe the bank 21 lakhs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.